शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

जोकोविच-वावरिंका जेतेपदासाठी झुंजणार

By admin | Updated: September 11, 2016 00:45 IST

जागतिक क्रमवारील अव्वल स्थानावर असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने लौकिकाला साजेशी कामगिरी करताना फ्रान्सच्या गाएल मोंफिल्सचा पराभव

न्यूयॉर्क : जागतिक क्रमवारील अव्वल स्थानावर असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने लौकिकाला साजेशी कामगिरी करताना फ्रान्सच्या गाएल मोंफिल्सचा पराभव करीत यूएस ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. जोकोविचला जेतेपदासाठी स्वित्झर्लंडच्या स्टेनिसलास वावरिंकाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. वावरिंकाने दुसऱ्या उपांत्य लढतीत जपानच्या केई निशिकोरीचा पराभव केला. आर्थर अ‍ॅश स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य लढतीत गतविजेत्या जोकोविचने १० व्या मानांकित मोंफिल्सचा ६-३, ६-२, ३-६, ६-२ ने पराभव केला. मोंफिल्सला जोकोविचविरुद्ध कारकिर्दीतील १३ सामन्यांमध्ये एकदाही विजय मिळवता आला नाही. २००८ मध्ये फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत धडक मारणारा मोंफिल्स ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत दुसऱ्यांदा उपांत्य फेरीत खेळत होता. कोर्टवर हेतुपुरस्सरपणे वेळकाढूपणाचे धोरण अवलंबनाऱ्या मोंफिल्सला प्रेक्षकांच्या हुटिंगलाही सामोरे जावे लागले. जोकोविच या स्पर्धेत आतापर्यंत केवळ दोनच सामने खेळला. कारण त्याला एका प्रतिस्पर्धी खेळाडूंकडून वॉक ओव्हर मिळाला तर दोन खेळाडूंनी अर्ध्यावर लढतीतून माघार घेतली होती. यंदा आॅस्ट्रेलियन व फ्रेंच ओपन स्पर्धेत जेतेपद पटकावणाऱ्या जोकोविचला यूएस ओपनच्या जेतेपदासाठी तिसऱ्या मानांकित स्वित्झर्लंडच्या स्टेनिसलास वावरिंकाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. तिसऱ्या मानांकित वावरिंकाने दुसऱ्या उपांत्य लढतीत सहव्या मानांकित निशिकोरीचा ४-६, ७-५, ६-४, ६-२ ने पराभव करीत अंतिम फेरीत स्थान मिळवले. निशिकोरीने यापूर्वी धक्कादायक निकालाची नोंद करताना जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला व दोनदा आॅलिम्पिक चॅम्पियन ठरलेल्या ब्रिटनच्या अ‍ॅन्डी मरेचा पराभव करीत उपांत्य फेरीत स्थान मिळवले होते. २९ वर्षीय जोकोविच रविवारी वावरिंकाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या अंतिम लढती तिरस्यांदा यूएस ओपनचे व कारकिर्दीतील १३ वे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकाण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. जोकोविचची वावरिंकाविरुद्धची कामगिरी १९-४ अशी आहे. गेल्या वर्षी फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत वावरिंकाने जोकोचा पराभव केला होता. (वृत्तसंस्था)