धोणीच्या पाठीचे स्नायू दुखावले, ऐनवेळी संघात पार्थिव पटेलचा समावेश

By Admin | Updated: February 22, 2016 18:48 IST2016-02-22T18:48:16+5:302016-02-22T18:48:50+5:30

भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. मर्यादित षटकाचा कर्णधार एम.एस धोणीचे सरावा दरम्यान पाठीचे स्नायू दुखावले गेले आहेत.

Dhoni's back muscles hurt, Parthiv Patel is included in the team | धोणीच्या पाठीचे स्नायू दुखावले, ऐनवेळी संघात पार्थिव पटेलचा समावेश

धोणीच्या पाठीचे स्नायू दुखावले, ऐनवेळी संघात पार्थिव पटेलचा समावेश

>ऑनलाइन लोकमत
ढाका, दि. २२ - आशिया कप आणि टी २० विश्वकप स्पर्धेसाठी भारतीय संघ बांग्लादेश दौऱ्यावर रवाना झाला आहे. या महिन्याच्या शेवटी आशिया कप स्पर्धेला सुरवात होत आहे तर पुढील महीन्यात टी २०चा विश्वकप स्पर्धा होणार आहे. त्यापुर्वीच आज भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. मर्यादित षटकाचा कर्णधार एम.एस धोणीचे सरावा दरम्यान पाठीचे स्नायू दुखावले गेले आहेत. त्याच्या पाठीत उसण भरल्या मुळे त्याला अचानक त्रास जाणवू लागला. कर्णधार धोणीच्या जागेवर विकेटकिपीगंसाठी पर्याय म्हणून ऐनवेळी संघात पार्थिव पटेलचा समावेश करण्यात आला आहे.
कर्णधार धोणीचा स्नायू दुखीचा त्रास जर वाढला तर त्याच्या अनुउपस्थितीत भारतीय संघाचे कर्णधारपद कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली कडे जाण्याची शक्यता आहे. 

Web Title: Dhoni's back muscles hurt, Parthiv Patel is included in the team