शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

धोनी मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी सज्ज

By admin | Updated: September 19, 2015 22:19 IST

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २ आॅक्टोबरपासून प्रारंभ होणाऱ्या टी-२० व वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय निवड समिती रविवारी संघाची निवड करणार आहे.

द. आफ्रिकेविरुद्ध मालिका : भारतीय टी-२०, वन-डे संघाची निवड आजबेंगळुरू : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २ आॅक्टोबरपासून प्रारंभ होणाऱ्या टी-२० व वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय निवड समिती रविवारी संघाची निवड करणार आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा सर्वांची नजर मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करणाऱ्या महेंद्रसिंह धोनीवर राहणार आहे. निवड समिती टी-२० मालिका व पहिल्या तीन वन-डे सामन्यांसाठी संघाची निवड करण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिका संघाच्या दौऱ्याची सुरुवात तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेने होणार आहे. त्यामुळे धोनी व निवड समितीचे लक्ष पुढील वर्षी भारतात होणाऱ्या टी-२० विश्वकप स्पर्धेवर राहणार आहे. झिम्बाब्वे दौऱ्यावर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताचा दुय्यम दर्जाचा संघ गेला होता. या संघात सात अव्वल खेळाडूंचा समावेश नव्हता. आता धोनी, विराट कोहली, सुरेश रैना, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन हे सर्व खेळाडू फिट आहेत. त्यामुळे युवा खेळाडूंना सीनियर खेळाडूंसाठी स्थान निर्माण करून द्यावे लागेल. सलामीवीर शिखर धवनची दुखापत केवळ चिंतेचा विषय आहे. त्याचा हात फ्रॅक्चर झाला होता. त्याची फिटनेस चाचणी अद्याप झालेली नाही. कसोटी स्पेशालिस्ट सलामीवीर मुरली विजयची झिम्बाब्वे दौऱ्यातील कामगिरी समाधानकारक होती. मर्यादित षटकांच्या समान्यांत तो उपयुक्तता सिद्ध करण्यास उत्सुक आहे. स्ट्राईक रोटेट करण्यात यशस्वी ठरत असल्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये धोनीने अजिंक्य रहाणेच्या तुलनेत अंबाती रायडूला झुकते माप दिले आहे. टी-२० क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करणारा केदार जाधव आणि मनीष पांडे यांच्या नावाचाही विचार होण्याची शक्यता आहे.भारत ‘अ’ संघातर्फे चमकदार कामगिरी करणारा पंजाबचा गुरकिरत सिंग मान आणि कर्नाटकचा मयंक अग्रवाल यांच्यासारखे नवे चेहरे निवड होण्याच्या शर्यतीत असू शकतात. अश्विनची निवड होणे निश्चित असून, दुसरा फिरकीपटू म्हणून निवड समिती हरभजन सिंगला प्राधान्य देते किंवा नाही, याबाबत उत्सुकता आहे. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवींद्र जडेजाचा विचार करता आला नव्हता. पण यावेळी त्याच्या नावाचा विचार होण्याची शक्यता आहे. वेगवान गोलंदाजीमध्ये ईशांत शर्माला संधी मिळाली, तर तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये स्वत:ची उपयुक्तता सिद्ध करण्यास उत्सुक आहे. ईशांतवर एका कसोटी सामन्याची बंदी आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मोहित शर्मा व भुवनेश्वर कुमार यांच्यावर धोनीचा विश्वास असून, धवल कुलकर्णीचा पर्यायी गोलंदाज म्हणून समावेश होण्याची शक्यता आहे. वरुण अ‍ॅरोन व उमेश यादव अनेकदा चुका करतात. पण भविष्यात होणाऱ्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचा विचार करता त्यांना या मालिकेत संधी मिळू शकते. (वृत्तसंस्था)