दीपक जोशी आंतरराष्ट्रीय आउटडोअर पंच

By Admin | Updated: August 19, 2015 22:27 IST2015-08-19T22:27:39+5:302015-08-19T22:27:39+5:30

Deepak Joshi International Outdoor Punch | दीपक जोशी आंतरराष्ट्रीय आउटडोअर पंच

दीपक जोशी आंतरराष्ट्रीय आउटडोअर पंच

>नवी दिल्ली: हॉकी इंडियाच्या राष्ट्रीय पातळीवरील पंच दीपक जोशी यांची आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने आंतरराष्ट्रीय आउटडोअर अंपायर्स पॅनलमध्ये समावेश केला आहे़ एफआयएचने जुलैमध्ये नेदरलँडच्या ब्रेडामध्ये झालेल्या अंडर २१ वॉल्व्हो निमंत्रितांच्या स्पर्धेमधील त्यांचे शानदार प्रदर्शन पाहून त्यांच्या नियुक्तीचा निर्णय घेतला़ दीपक यांनी २०१२ मध्ये सेल राष्ट्रीय कॉलेज चॅम्पियनशिपच्या माध्यमातून हॉकी अंपायर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती़ त्यांनी आतापर्यंत ३५ राष्ट्रीय सामन्यांमध्ये पंचांची भूमिका निभावली आहे़

Web Title: Deepak Joshi International Outdoor Punch