शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

डीसिल्वा, चंडीमल यांची दमदार शतकी खेळी

By admin | Updated: August 15, 2016 04:20 IST

शानदार शतकाच्या जोरावर यजमान श्रीलंकाने आॅस्टे्रलियाविरुध्द तिसऱ्या कसोटीत पहिल्या डावामध्ये ३५५ धावांची मजल मारली

कोलोंबो : धनंजय डीसिल्वा (१२९) आणि यष्टीरक्षक दिनेश चंडिमल (१३२) यांच्या शानदार शतकाच्या जोरावर यजमान श्रीलंकाने आॅस्टे्रलियाविरुध्द तिसऱ्या कसोटीत पहिल्या डावामध्ये ३५५ धावांची मजल मारली. यानंतर आॅसी संघाने दुसऱ्या दिवसअखेर १ बाद १४२ धावांची दमदार मजल मारली.आॅस्टे्रलिया अजूनही लंकेपेक्षा २१४ धावांनी पिछाडीवर असून त्यांचे ९ फलंदाज शिल्लक आहेत. विशेष म्हणजे भरवशाचा आणि फॉर्ममध्ये असलेला आॅस्टे्रलियाचा सलामीवीर डेव्हीड वॉर्नर (११) स्वस्तात बाद झाला. त्याला लंकेचा शतकवीर धनंजय डीसिल्वाने बाद केले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा शॉन मार्श (नाबाद ६४) आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथ (नाबाद ६१) खेळपट्टीवर टिकून होते. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १२० धावांची नाबाद भागीदारी करुन आॅसीला सावरले. कर्णधार स्मिथने यावेळी ४४ सामन्यांत ४ हजार धावांचा टप्प पार केला. मार्शने १४१ चेंडूत १० चौकार मारले असून स्मिथने १०८ चेंडूत ५ चौकार व एक उत्तुंग षटकार ठोकला आहे.तत्पूर्वी, चंडिमल आणि डीसिल्वा यांनी सहाव्या विकेटसाठी २११ धावांची जबरदस्त भागीदारी करुन संघाला प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर काढले. चंडिमलने ३५६ चेंडूत १३ चौकार व एका षटकारासह १३२ धावांची खेळी केली. तर, डीसिल्वाने २८० चेंडूत १८ चौकारांसह शानदार १२९ धावा फटकावल्या. आॅसीकडून वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने ६३ धावांत ५ बळी घेतले. तर आॅफस्पिनर नॅथान लिआॅननेही चांगला मारा करताना ११० धावांच्या मोबदल्यात ३ फलंदाज बाद केले. (वृत्तसंस्था)>संक्षिप्त धावफलकश्रीलंका (पहिला डाव) : १४१.१ षटकात सर्वबाद ३५५ धावा.(दिनेश चंडिमल १३२, धनंजन डीसिल्वा १२९; मिशेल स्टार्क ५/६३,नॅथन लिआॅन ३/११०)आॅस्टे्रलिया (पहिला डाव) : ४३ षटकात १ बाद १४१ धावा (डेव्हीड वॉर्नर ११, शॉन मार्श खेळत आहे ६४, स्टीव्ह स्मिथ खेळत आहे ६१; धनंजन डीसिल्वा १/२०)