शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्न पाहण्याचे धाडस केल्याने यशस्वी

By admin | Updated: September 14, 2016 05:11 IST

मी स्वप्न पाहिले आणि त्याहून महत्त्वाचे ते स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत दाखवली; म्हणून पदक मिळविण्यात यशस्वी ठरले, अशी प्रतिक्रिया पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक मिळविणारी पहिला

नवी दिल्ली : मी स्वप्न पाहिले आणि त्याहून महत्त्वाचे ते स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत दाखवली; म्हणून पदक मिळविण्यात यशस्वी ठरले, अशी प्रतिक्रिया पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक मिळविणारी पहिला भारतीय महिला खेळाडू दीपा मलिकने दिली. रिओ पॅरालिम्पिकमध्ये दीपाने एफ.५३ प्रकारात गोळाफेक स्पर्धेत भारताला रौप्यपदक मिळवून देऊन अभिमानास्पद कामगिरी केली. दीपाने सांगितले, ‘‘मी स्वप्न पाहण्याचे धाडस केले. त्याचप्रमाणे कठोर मेहनत घेण्याची माझी तयारी असल्याने त्या जोरावर मी माझे स्वप्न पूर्ण करू शकले. बहुतेक महिला ही संधी घालवतात; परंतु माझा निर्धार पक्का होता. मी माझ्या परिवाराकडेही कधी दुर्लक्ष केले नाही.’’ कमरेखालील भागामध्ये अर्धांगवायूचा झटका आलेल्या दीपावर पाठीच्या कण्यातील असलेल्या ट्युमरवर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर ती सुमारे १७ वर्षांपासून व्हीलचेअरवर आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे, दीपावर तब्बल ३१ शस्त्रक्रिया झालेल्या आहेत.पदक जिंकल्यानंतर दीपा म्हणाली, ‘‘हे पदक जिंकून मी खूप आनंदी आहे आणि देशासाठी हे पदक जिंकल्याने त्याचा आनंद अधिक आहे. माझे प्रशिक्षक, भारतीय क्रीडा प्रधिकारण आणि क्रीडा मंत्रालयाची मी आभारी आहे. शिवाय, माझे टे्रनर असलेले माझे पती यांची मी खूप आभारी आहे. माझ्या मुली माझी ताकद आणि प्रेरणा आहेत. मायदेशी परतण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.’’त्याचप्रमाणे, ‘‘मी आधी बाइकर, जलतरणपटू आणि रॅली ड्रायव्हर होते. आता देशाची पहिली महिला पॅरालिम्पिक पदकविजेती ठरले आहे. ही खूप मोठी बाब आहे. याचे श्रेय मी माझा परिवार आणि देशाला देईन.’’ (वृत्तसंस्था)४ कोटींचे रोख पारितोषिक...हरियाणा सरकारने आपल्या क्रीडा धोरणानुसार दीपा मलिकला ४ कोटी रुपयांचे रोख पारितोषिक देण्याची घोषणा केली. विशेष म्हणजे, रिओ आॅलिम्पिकमध्ये कुस्तीत कांस्यपदक पटकावणारी भारतीय महिला मल्ल साक्षी मलिक हीदेखील हरियाणा राज्याचीच आहे. वरुणला एक कोटी मिळणार...रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत उंच उडी खेळामध्ये कांस्य पटकावलेला वरुण भाटी याला उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली. यूपी सरकारच्या अधिकृत पत्राद्वारे मुख्यमंत्री अखिलेश यांनी सांगितले, ‘‘वरुणने मेहनत आणि समर्पण या जोरावर देशाचे आणि राज्याचे नाव उंचावले आहे. त्याच्या या यशामुळे इतर दिव्यांग खेळाडूंना प्रेरणा मिळेल.’’राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा...दीपाने मिळविलेल्या यशाचे अभिनंदन करताना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सांगितले, ‘‘दीपाने मिळविलेले यश सर्व भारतीयांसाठी गौरवास्पद आहे. प्रत्येक खेळाडूसह देशातील शारीरिकरीत्या कमजोर असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठीदेखील दीपाचे यश प्रेरणादायी आहे. दीपाच्या यशाने सिद्ध होत आहे, की मेहनत आणि समर्पणाच्या जोरावर ध्येय आणि यश मिळविता येते. भविष्यातील वाटचालीसाठी मी दीपाला शिभेच्छा देतो.’’