CSK चे१३४ धावांवर ६ गडी बाद

By Admin | Updated: April 28, 2015 21:39 IST2015-04-28T21:39:54+5:302015-04-28T21:39:54+5:30

आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर चेन्नई सुपर किंग्जचे दोन महत्वाचे फलंदाज बाद झाले.

CSK's 6 for 134 runs | CSK चे१३४ धावांवर ६ गडी बाद

CSK चे१३४ धावांवर ६ गडी बाद

>ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. २८ - आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर चेन्नई सुपर किंग्जचे दोन महत्वाचे फलंदाज बाद झाले. 
डु प्लेसीस व स्मिथ वगळता एकाही फलंदाजाला फार काळ मैदानावर टिकता आले नाही. नाणेफेक जिंकत कोलकाता नाइट रायडर्सने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज सुरेश रैना जोरदार फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात असताना रसेलच्याच चेंडूवर उथप्पाकडे झेल गेल्याने निराश होत तंबूत परतला. त्याचप्रमाणे महेंद्र सिंग धोनीकडून प्रेक्षकांना फार अपेक्षा होत्या परंतू, रसेच्याच चेंडूवर यष्टीरक्षक उथप्पकडे झेल गेल्याने त्याला अवघ्या तीन धावांत तंबूत परतावे लागले. चेन्नईतील मैदानावर होणा-या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज कडून प्रेक्षकांच्या भरपूर अपेक्षा होत्या परंतू, त्यांच्या अपेक्षांना चेन्नई सुपर किंग्जचे फलंदाजांनी निराशेत रुपांतरीत केले आहे. 

Web Title: CSK's 6 for 134 runs