शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

आक्रमक स्पेलनंतर आत्मविश्वास उंचावला

By admin | Updated: December 8, 2015 23:50 IST

फि रोजशाह कोटला मैदानावर चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात अखेरच्या दिवशी चहापानानंतर उमेश यादवच्या आक्रमक स्पेलच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला.

नवी दिल्ली : फि रोजशाह कोटला मैदानावर चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात अखेरच्या दिवशी चहापानानंतर उमेश यादवच्या आक्रमक स्पेलच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. या स्पेलनंतर आत्मविश्वास उंचावला असल्याची प्रतिक्रिया उमेशने व्यक्त केली. यादवने सोमवारी अखेरच्या सत्रात ६ निर्धाव षटके टाकून ३ बळी घेतले. त्याने दुसऱ्या डावात २१ षटकांत १६ निर्धाव षटके टाकून ९ धावांच्या मोबदल्यात ३ फलंदाजांना तंबूचा मार्ग दाखविला. यादव म्हणाला, ‘‘मला माझ्या कसोटी कारकिर्दीत ब्रेकमध्ये काही सामने खेळण्याची संधी मिळाली. मी सलग काही सामने खेळलेलो नाही. या स्पेलनंतर माझा आत्मविश्वास उंचावण्यास मदत झाली. मी आतापार्यंत कसोटी क्रिकेट खेळताना किंवा स्थानिक क्रिकेट खेळताना जे काही आत्मसात केले, ते सर्व या स्पेलमध्ये दाखविण्याची वेळ आली आहे, असे मला वाटले.’’अखेरच्या सत्रासाठी मैदानात उतरण्यापूर्वीच्या मानसिकतेबाबत यादव म्हणाला, ‘‘आगामी ६ महिन्यांसाठी मला हा अखेरचा कसोटी सामना खेळायचा आहे. दक्षिण आफ्रिकेला ३-० ने पराभूत करण्याची संधी पुन्हा केव्हा मिळेल किंवा नाही, हे सांगता येत नाही. एक बळी मिळविला तर विजयाचा मार्ग मोकळा होईल, असे मला वाटत होते. मी केवळ एक बळी घेण्यासाठी प्रयत्नशील होतो.’’यादवने डेन विलास व केली एबोट यांना इनस्विंगवर तंबूचा मार्ग दाखविल्यानंतर डेन पिएटला यष्टीमागे झेल देण्यास भाग पाडून कोटलावर भारताच्या विजयाचा मार्ग प्रशस्त केला. यादव म्हणाला, ‘‘चहापानाच्या विश्रांतीदरम्यान कोन बदलून गोलंदाजी केल्यास चेंडू अधिक स्विंग होण्यास मदत मिळेल, अशी चचा केली. मी त्यानुसार मारा केला आणि यश मिळाले. मी या शैलीने चेंडू नेहमीपेक्षा अधिक स्विंग करू शकलो. चेंडू उशिरा स्विंग होत असल्यामुळे फलंदाजांनाही चेंडूबाबत अचूक अंदाज येत नव्हता.’’ (वृत्तसंस्था)