शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

चीन नवव्यांदा अव्वल स्थानाचा दावेदार

By admin | Updated: September 9, 2014 03:50 IST

आशियाई स्पर्धेत २८ ऑलिम्पिक व ८ बिगर ऑलिम्पिक खेळांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने ४३९ सुवर्णपदकांसाठी चुरस

सेऊल : ऑलिम्पिक व आशियात खेळांमध्ये महाशक्ती असलेला चीन दक्षिण कोरियातील इंचियोनमध्ये १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित १७ व्या आशियाई स्पर्धेत सलग नवव्यांदा पदकतालिकेत अव्वल स्थान पटकाविण्याच्या निर्धाराने सहभागी होणार आहे.१७ व्या आशियाई स्पर्धेत १0 हजार खेळाडू सहभागी होणार असून, १६ दिवसांच्या या स्पर्धेत सहभागी होणार्‍या खेळाडूंच्या संख्येचा विचार करता, ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार्‍या खेळाडूनंतर ही दुसर्‍या क्रमांकाची स्पर्धा ठरणार आहे. आशियाई स्पर्धेत २८ ऑलिम्पिक व ८ बिगर ऑलिम्पिक खेळांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने ४३९ सुवर्णपदकांसाठी चुरस अनुभवाला मिळणार असून, त्यात आशियातील प्रतिभावान खेळाडूंची क्षमता सिद्ध होणार आहे. या स्पर्धेत सर्वाधिक पदकांची कमाई करीत चीन सलग नवव्यांदा अव्वल स्थान पटकाविणार असल्याचे जवळजवळ निश्‍चित आहे. यजमान दक्षिण कोरियाने ९0 सुवर्णपदके जिंकण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. परंपरागत प्रतिस्पर्धी जपानपेक्षा अधिक पदके पटकाविण्याचे कोरियाचे लक्ष्य आहे. क्रीडा जगतात भारत अपेक्षेपेक्षा कमकुवत कामगिरीसाठी ओळखल्या जातो. चार वर्षांपूर्वी ग्वांग्झू आशियाई स्पर्धेत भारताने १४ सुवर्णपदके पटकाविण्याची कामगिरी केली होती. यावेळी यामध्ये सुधारणा करण्यास भारत प्रयत्नशील आहे. भारताने अद्याप आशियाई स्पर्धेसाठी पथक जाहीर केलेले नाही. ग्वांग्झूच्या शानदार आयोजनानंतर यावेळी दक्षिण कोरियाने आयोजनासाठी जवळजवळ १.२ अब्ज डॉलर्स खर्च केलेले आहेत. दक्षिण कोरिया तिसर्‍यांदा प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे यजमानपद भूषविणार आहे. आर्थिक अडचणीमध्ये असलेला चीन इंचियोनमध्ये ८९९ खेळाडूंचे सर्वात मोठे पथक पाठविण्यासाठी सज्ज आहे.चीनचे खेळाडू जलतरण, जिम्नॅस्टिक, टेबल टेनिस आणि बॅडमिंटनमध्ये आपले वर्चस्व कायम राखण्यास उत्सुक आहेत. त्याचप्रमाणे चीनचे खेळाडू अन्य ३२ क्रीडा प्रकारात पदक जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहेत.आशिया खंडातील अनेक खेळाडू या स्पर्धेत छाप सोडण्याच्या निर्धाराने कोरियात दाखल होत असताना, दक्षिण कोरियातील खेळाडूंसाठी ही स्पर्धा प्रतिष्ठेची झाली आहे. या स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणार्‍या दक्षिण कोरियातील खेळाडूंना सेनेमध्ये दोन वर्षांची सक्तीची सेवा देण्याच्या अटीतून सूट मिळणार आहे. दक्षिण कोरिया व शेजारी उत्तर कोरिया यांच्यादरम्यान नेहमी युद्धजन्य स्थिती असते. उभय देशांदरम्यान १९५0-५३ च्या युद्धानंतर सलोखा झाला नव्हता. त्यामुळे येथे दोन वर्षे सेनेसाठी देणे अनिवार्य आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कोरियाने आशियाडमध्ये सुवर्ण व ऑलिम्पिकमध्ये कुठलेही पदक पटकाविणार्‍या खेळाडूंना यात सूट जाहीर केलेली आहे. उत्तर कोरियाने आपल्या खेळाडूंना स्पर्धेसाठी पाठविण्यापूर्वी गेल्या महिन्यात ३५0 चीअर लिडर्स न पाठविण्याचा निर्णय घेतला होता. उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर राजकीय लाभ घेण्यासाठी खेळाचा दुरुपयोग करीत असल्याचा आरोप केला होता. उत्तर व दक्षिण कोरियाच्या खेळाडूंनी २000 च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये एकत्र मार्चपास्ट केले होते. पण त्यानंतर उभय देशांदरम्यानचे संबंध सुधारण्यापेक्षा अधिक बिघडले. खेळाडूंना या स्पर्धेसाठी पाठविण्याबाबत उभय देशांदरम्यान चर्चा सुरू असून, दक्षिण कोरिया १५0 खेळाडूंचे पथक पाठवेल, अशी आशा आहे.२0२0 च्या आशियाई स्पर्धेचे यजमानपद जपानला (टोकियो) मिळालेले आहे. जपानने दोन वर्षांपूर्वी लंडन ऑलिम्पिकमध्ये केवळ सात सुवर्णपदकांची कमाई केली होती. चार वर्षांपूर्वी जपान आशियाई स्पर्धेत पदकतालिकेत चीन व दक्षिण कोरियानंतर तिसर्‍या स्थानावर होता. जपान आशियाई स्पर्धेसाठी ७१६ खेळाडूंचे पथक पाठविणार आहे. (वृत्तसंस्था)