शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
3
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
4
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
5
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
6
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
7
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
8
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
9
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
10
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
11
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
12
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
13
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
14
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
15
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
16
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
17
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
18
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
19
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
20
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भारतासमोर विजयासाठी 265 धावांचे आव्हान

By admin | Updated: June 15, 2017 21:22 IST

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज सुरू असलेल्या दुसऱ्या उपांत्य लढतीत बांगलादेशने भारतासमोर विजयासाठी 265 धावांचे आव्हान ठेवले.

 ऑनलाइन लोकमत

बर्मिंगहॅम, दि. 15 - आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज सुरू असलेल्या दुसऱ्या उपांत्य लढतीत बांगलादेशने भारतासमोर विजयासाठी 265 धावांचे आव्हान ठेवले. दोन गडी झटपट बाद झाल्यानंतर तमीम इक्बाल आणि मुशफिकूर रहिमने 123 धावांच्या केलेल्या भागीदारीमुळे बांगलादेशने मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र कर्णधार विराट कोहलीने गोलंदाजीमध्ये चातुर्याने केलेले बदल आणि मोक्याच्या क्षणी गोलंदाजांनी केलेला टिच्चून मारा याच्या जोरावर भारताने बांगलादेशला 7 बाद 264 धावांवरच रोखले.

तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणाऱ्या भारताच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न बांगलादेशी फलंदाजांनी केला. दोन गडी झटपट बाद झाल्यानंतर तमीम इक्बाल (70) आणि मुशफिकूर रहिम (61) यांनी तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या 123 धावांच्या भागीदारीच्या जोरावर बांगलादेशने 2 बाद 150 अशी मजल मारली होती.  
पण ही जोडी धोकादायक ठरतेय असे वाटत असतानाच विराटने केदार जाधवच्या हाती चेंडू दिला. मग केदारने तमीम आणि मुशफिकूरची विकेट काढत भारताला सामन्यात कमबॅक करून दिले. शाकिब अल हसन (15) आणि महमदुल्ला (21) हेही झटपट बाद झाल्याने बांगलादेशच्या डावाला ब्रेक लागला. अखेर निर्धारित 50 षटकात त्यांना 7 बाद 264 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून केदार जाधव, जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वरने प्रत्येकी दोन तर, रवींद्र जडेजाने एक गडी बाद केला.