चंडीगड, हिमाचलची आगेकूच

By Admin | Updated: April 13, 2015 11:37 IST2015-04-13T03:53:10+5:302015-04-13T11:37:34+5:30

राष्ट्रीय वरिष्ठ गट हॉकी स्पर्धेत ‘ग’ गटातून चंडीगडने पुदुचेरीचा ५-२ ने पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला.

Chandigarh, front of Himachal | चंडीगड, हिमाचलची आगेकूच

चंडीगड, हिमाचलची आगेकूच

पुणे : राष्ट्रीय वरिष्ठ गट हॉकी स्पर्धेत ‘ग’ गटातून चंडीगडने पुदुचेरीचा ५-२ ने पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला चुरशीच्या झालेल्या सामन्यात हिमाचल संघाने मेजर पोर्ट स्पोर्ट कंट्रोल बोर्डाला गोलशून्य बरोबरीत रोखत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सोमवारपासून स्पर्धेच्या बाद फेरीतील सामन्यांस सुरुवात होणार आहे.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात रविवारी झालेल्या सामन्यात ‘ग’ गटामध्ये चंडीगडकडून अमनप्रीतसिंग (१० मि़), हरवंत सिंग (४१ मि़), रंजोध सिंग (५३ व ५७ मि़), रणवंत सिंग (५८ मि़) यांनी गोल करीत संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला. मध्यंतरापर्यंत चंडीगडकडे केवळ १-० अशी आघाडी होती. मात्र यानंतर रंजोध सिंगने निर्णायक कामगिरी करताना दोन गोल करून चंडीगडचा विजय साकारला. पराभूत पुदुचेरी संघाकडून आर. रघू (४८ मि़) व जे. सुदर्शन (६० मि़) गोल करण्यात यशस्वी ठरले. याच गटात अन्य एका सामन्यात बिहारने दादरा नगर हवेली संघाला २-१ अशी मात दिली. बिहारच्या रोशन एक्काने (२२ व ४२ मि़) सामन्यात एकहाती वर्चस्व राखताना दोन गोल करीत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

Web Title: Chandigarh, front of Himachal