शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
2
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
3
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
4
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
5
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
6
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
7
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
8
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
9
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
10
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
11
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
12
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
13
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
14
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
15
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
16
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
17
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
18
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
19
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
20
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

स्टेनचा मारा खेळणे वेगळे आव्हान

By admin | Updated: November 1, 2015 02:50 IST

कसोटी क्रिकेटमध्ये डेल स्टेनचा मारा खेळणे वेगळे आव्हान असल्याचे मत भारतीय सलामीवीर लोकेश राहुल याने व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली : कसोटी क्रिकेटमध्ये डेल स्टेनचा मारा खेळणे वेगळे आव्हान असल्याचे मत भारतीय सलामीवीर लोकेश राहुल याने व्यक्त केले आहे.द. आफ्रिकेविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज असलेला राहुल आयपीएलमध्ये सनराइजर्स संघाकडून स्टेनसोबत खेळला आहे. पण बोर्ड एकादशकडून द. आफ्रिकेविरुद्ध ७२ धावांची खेळी हा वेगळाच अनुभव असल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला, ‘स्टेनचा मारा सहज खेळता येईल, असे वाटले होते; पण आज बोर्ड एकादशसाठी त्याच्या गोलंदाजीचा सामना करताना वेगळा अनुभव आला. त्याच्या गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण किंवा यष्टिरक्षण करणे ही वेगळी बाब आणि मारा खेळून काढणे, ही वेगळी बाब आहे. स्टेन चेंडू आपल्या मनगटाने हवा तसा वळवितो. त्याचे चेंडू खेळणे आव्हानात्मक आहे. स्टेनविरुद्ध खेळण्याचे आव्हान पेलायची मला उत्सुकता आहे.’पाच कसोटी सामन्यांत राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या २३ वर्षांच्या राहुलने स्टेनच्या मनात काय आहे, हे समजणे कठीण असल्याची कबुली दिली. मी तो प्रयत्न करणार असल्याचे सांगून वेगवान गोलंदाजाच्या मनातले हेरणे किती कठीण असते आणि वेगवान गोलंदाज प्रत्येक सामन्यात वेगळा विचार करतात. त्यांचे चेंडू किती शिताफीने खेळायचे याचे डावपेच आपल्याकडे असायला हवेत, असे लोकेश म्हणाला.कर्नाटकच्या या सलामीवीराने कसोटीची तयारी करण्याचे श्रेय कर्नाटकचे कोच अरुण कुमार यांना दिले. तो म्हणाला, ‘मी द. आफ्रिकेविरुद्ध कसोटी डोळ्यापुढे ठेवून वळण घेणाऱ्या चेंडूंवर टोलेबाजी करण्याचा सराव केला. मी अरुण कुमार यांच्याकडून धडे घेत असून आखूड टप्प्याचे पण वेगवान चेंडू खेळण्यावर भर देत आहे. आतापर्यंतचा प्रवास चांगलाच राहिला.’ सलामीवीरासाठी राहुलची स्पर्धा शिखर धवन आणि मुरली विजय यांच्यासोबत आहे. पण राहुलच्या मते भारतीय तंबूत कुठलीही स्पर्धा नाही. तो म्हणतो,‘ज्या दिवशी मी ड्रेसिंगरुममध्ये प्रवेश केला तेव्हापासून मला कुठलीही स्पर्धा जाणवली नाही. शिखर आणि विजय यांनी मला कसोटी सामना रणजीच्या तुलनेत किती वेगळा आहे, याबद्दल समजावून सांगितले. दोघांच्याही टीप्समुळे माझे काम सोपे झाले आहे. आम्ही सर्वजण युवा असल्याने मैत्रीपूर्ण वातावरण आहे. आम्ही सर्वजण एकमेकांना प्रोत्साहन देतो. एकमेकांच्या कामगिरीचा आनंदही लुटतो. याचा सकारात्मक परिणाम संघाच्या कामगिरीवर पडतो.’ (वृत्तसंस्था)