एअर इंडियाकडून साक्षीला बिझनेस क्लास तिकीट

By Admin | Updated: August 20, 2016 02:48 IST2016-08-20T02:27:28+5:302016-08-20T02:48:03+5:30

रिओ आॅलिम्पिकमध्ये देशाला पहिले पदक जिंकून देणारी महिला पहिलवान साक्षी मलिक हिला एअर इंडिया नेटवर्कने कोठेही फिरण्यासाठी दोन बिझनेस तिकीट बक्षीसरूपाने देण्याची

Business Class ticket from Air India witnessed | एअर इंडियाकडून साक्षीला बिझनेस क्लास तिकीट

एअर इंडियाकडून साक्षीला बिझनेस क्लास तिकीट

नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमध्ये देशाला पहिले पदक जिंकून देणारी महिला पहिलवान साक्षी मलिक हिला एअर इंडिया नेटवर्कने कोठेही फिरण्यासाठी दोन बिझनेस तिकीट बक्षीसरूपाने देण्याची घोषणा केली आहे. साक्षी एका वर्षाच्या आत हे तिकीट घेऊ शकते. पूर्ण देशभरात हरियाणाच्या साक्षीवर अभिनंदनाचा वर्षाव होत असतानाच एअर इंडियाने साक्षीला ही अनोखी भेट दिली आहे. विशेष म्हणजे, जिंकल्यानंतर साक्षीने तिची विमानाने फिरण्याची इच्छा असल्यामुळे आपण खेळाडू बनलो, असे म्हटले होते. एअर इंडियाचे अध्यक्ष अश्विनी लोहानी यांनी साक्षीला एक पत्र लिहिले आहे. ते म्हणाले की, देशाला रिओत आॅलिम्पिकमध्ये पहिले पदक जिंकून दिल्याचा एअर इंडियाच्या कुटुंबास तुझ्या कामगिरीचा अभिमान आहे. विमानाने फिरायला मिळावे म्हणून खेळाडू बनल्याचे आपण वाचले. ही बाब माझ्या मनाला स्पर्शून गेली. आम्ही तुझ्या या कामगिरीचा सन्मान करताना एअर इंडियाच्या नेटवर्कमध्ये कोठेही फिरण्यासाठी दोन बिझनेस तिकीट देण्याची घोषणा करतो.

Web Title: Business Class ticket from Air India witnessed