ब्राझीलची बोलेव्हियावर ५-० गोलने मात

By Admin | Updated: October 8, 2016 03:48 IST2016-10-08T03:48:21+5:302016-10-08T03:48:21+5:30

ब्राझीलचा स्टार स्ट्रायकर नेमारच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर ब्राझीलने विश्वचषक पात्रता फेरीत बोलेव्हियाला ५-० असे पराभूत केले

Brazil beat Bolivia 5-0 | ब्राझीलची बोलेव्हियावर ५-० गोलने मात

ब्राझीलची बोलेव्हियावर ५-० गोलने मात


नाताल : ब्राझीलचा स्टार स्ट्रायकर नेमारच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर ब्राझीलने विश्वचषक पात्रता फेरीत बोलेव्हियाला ५-० असे पराभूत केले
गुरुवारी झालेल्या सामन्यात नेमारने एक गोल केला. तर दोन गोलमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. ब्राझीलकडून नेमारने १० व्या, फिलिक कौतिन्होने २५ व्या, फिलिप लुईसने ३८ व्या, गॅब्रियल जीझसने ४३ व्या, तर रॉर्बटो फिरमिनोने ७५ व्या मिनिटाला गोल केले. बार्सिलोनाकडून खेळणाऱ्या २४ वर्षांच्या नेमारने ७७ सामन्यांत आतापर्यंत ४९ गोल केले आहेत. सामन्यादरम्यान बोलेव्हियाचा बचावपटू डूकचा कोपर नेमारच्या डोक्यात लागल्याने नेमारला दुखापत झाली. मोठ्या प्रमाणावर रक्त आल्यामुळे नेमारला मैदानाबाहेर न्यावे लागले. नवीन व्यवस्थापक टिटे याच्या नेतृत्वाखालील ब्राझीलचा हा सलग तिसरा विजय आहे. ब्राझीलचे नऊ सामन्यांतून १८ गुण झाले असून, तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.(वृत्तसंस्था)

Web Title: Brazil beat Bolivia 5-0