शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

एका षटकात दोन्हीही हातांनी गोलंदाजी

By admin | Updated: January 21, 2016 03:25 IST

क्रीडानगरी म्हणून पांढरकवड्याचा उल्लेख क्रीडा जगतात नेहमी केला जातो. आता क्रिकेट या आंतरराष्ट्रीय खेळातही पांढरकवड्याच्या (जि. यवतमाळ) अक्षय किसन कर्णेवार

नरेश मानकर,  पांढरकवडा (यवतमाळ)क्रीडानगरी म्हणून पांढरकवड्याचा उल्लेख क्रीडा जगतात नेहमी केला जातो. आता क्रिकेट या आंतरराष्ट्रीय खेळातही पांढरकवड्याच्या (जि. यवतमाळ) अक्षय किसन कर्णेवार या युवकाने शहराचे नाव चमकविले आहे.नुकत्याच मुंबई येथील वानखडे स्टेडियमवर झालेल्या टी-२० सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी क्रिकेट सामन्यात विदर्भाचा स्पिनर अक्षय कर्णेवारने बडोदा विरुध्द एका ओव्हरमधील सहाही चेंडू हात बदलून फेकले. यामुळे फलंदाज त्रस्त झाले. त्याच्या या ‘रँडम बॉलिंग स्टाईल’ने भारतीय क्रिकेट जगतातील सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.१९ वर्षाखालील विदर्भाच्या संघात अक्षयने बरेचदा आपली चुणूक दाखवली. यावर्षी विजय हजारे ट्राफीमध्येसुध्दा विदर्भ संघात तो होता. त्याने सात सामन्यांत १६ बळी घेतले. गेल्या ३ जानेवारीपासून मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर सुरू झालेल्या सय्यद मुस्ताक अली टी२० सामने खेळून आलेल्या अक्षयचे मंगळवारी पांढरकवडा येथे उत्स्फूर्त स्वागत केले.विदर्भाचे नाव चमकविणाऱ्या अक्षयचे सर्वात प्रथम ‘लोकमत’ने त्याच्या घरी जाऊन अभिनंदन केले. अक्षयचे वडील किसन कर्णेवार एस.टी.मध्ये क्लीनर आहेत. आई वंदना व बहीण दीक्षा यांनी अक्षयला प्रोत्साहन दिले. अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेले कर्णेवार कुटुंब आपल्या मुलाने क्रिकेटमध्ये चांगलीे प्रगती करावी, यासाठी त्याला सर्वतोपरी मदत करतात.