बोपन्ना-फ्लोरिनला उपविजेतेपद

By Admin | Updated: January 17, 2016 03:24 IST2016-01-17T03:24:52+5:302016-01-17T03:24:52+5:30

दुहेरीतील भारताचा स्टार टेनिसपटू रोहन बोपन्ना आणि रोमानियाचा फ्लोरिन मर्जिया या जोडीला सिडनी इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

Bopanna-Florina was runner-up | बोपन्ना-फ्लोरिनला उपविजेतेपद

बोपन्ना-फ्लोरिनला उपविजेतेपद

सिडनी : दुहेरीतील भारताचा स्टार टेनिसपटू रोहन बोपन्ना आणि रोमानियाचा फ्लोरिन मर्जिया या जोडीला सिडनी इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. जेमी मरे आणि ब्रुनो सोरेस या जोडीने फायनलमध्ये विजय मिळवून किताब आपल्या नावे केला.
बोपन्ना आणि मर्जिया या चौथे मानांकन प्राप्त जोडीला अंतिम सामन्यात ब्रिटनचा जेमी मरे आणि ब्राझीलचा ब्रुनो सोरेस यांच्याकडून ३-६, ६-७ गुणांनी पराभवाचा सामना करावा लागला. मरे आणि सोरेस यांनी हा सामना १ तास आणि २९ मिनिटांत आपल्या नावे केला. विशेष म्हणजे बोपन्ना आणि मर्जिया यांना हा सामना सुपर टायब्रेकपर्यंत खेचून ४-० अशी आघाडी घेण्याची संधी होती. मात्र, मरे आणि सोरेस यांनी जोरदार मुसंडी मारताना सामन्यासह किताबावर आपले नाव कोरले. भारत आणि रोमानियाच्या जोडीने पहिल्या सेटमध्ये दोन वेळा सर्व्हिस गमावली. त्यानंतर मरे आणि सोरेस यांनी हा सेट ६-३ ने जिंकत सामन्यात आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये बोपन्ना आणि मर्जिया यांना कामगिरी उंचावता आली नाही. त्यामुळे त्यांचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले. गत वर्षी स्पर्धेच्या दुहेरी लढतीत बोपन्नाने कॅनडाच्या डॅनियल नेस्टरसह जेतेपदाला गवसणी घातली होती. (वृत्तसंस्था)

Web Title: Bopanna-Florina was runner-up