आॅस्ट्रेलियन माध्यमांवर बिग बी उखडले

By Admin | Updated: March 23, 2017 00:29 IST2017-03-23T00:29:56+5:302017-03-23T00:29:56+5:30

आॅस्ट्रेलियातील माध्यमांनी भारताचा कर्णधार विराट कोहली याची तुलना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी केल्यानंतर

Big B was beaten on Australian media | आॅस्ट्रेलियन माध्यमांवर बिग बी उखडले

आॅस्ट्रेलियन माध्यमांवर बिग बी उखडले

मुंबई : आॅस्ट्रेलियातील माध्यमांनी भारताचा कर्णधार विराट कोहली याची तुलना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी केल्यानंतर कोहलीच्या समर्थनार्थ ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन मैदानात उतरले. ‘बिग बी’ यांनी कोहलीच्या पाठीशी उभे राहून आॅस्ट्रेलियन माध्यमांवर सडकून टीका केली.
आॅस्ट्रेलियातील माध्यमांनी विराटला क्रीडा क्षेत्रातील डोनाल्ड ट्रम्प असे म्हटले. खरे तर त्यांचे आभार मानायला हवेत. कारण, या विधानातून कोहली विजेता आणि अध्यक्ष असल्याचे आॅस्ट्रेलियातील माध्यमांनी एकप्रकारे मान्यच केले आहे. आॅस्ट्रेलियन माध्यमांचे त्याबद्दल जाहीर आभार, असे खोचक टिष्ट्वट अमिताभ बच्चन यांनी आपल्या टिष्ट्वटर हँडलवर केले.
स्लेजिंग ते प्रतिस्पर्धी खेळाडूंसोबत झालेली बाचाबाची या प्रसंगांमुळे कोहलीवर आॅस्ट्रेलियाच्या माध्यमांकडून टीका करण्यात आली. दोन संघांमधील हा मुकाबला प्रत्यक्षात ‘कोहली विरु द्ध आॅस्ट्रेलियन संघ’ अशा खडाजंगीत परावर्तित झाला आहे. रांची कसोटी अनिर्णीत राखल्यानंतर आॅस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमांनी संघाचे कौतुक करताना विराट कोहलीला उद्देशून विखारी टीका केली.
‘कोहली म्हणजे जागतिक क्र ीडा क्षेत्रातील डोनाल्ड ट्रम्प आहे,’अशी बोचरी टीका आॅस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमांनी केली आहे.
तेढ निर्माण करणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ओळखले जातात.
(वृत्तसंस्था)

Web Title: Big B was beaten on Australian media