बांग्लादेश ७० धावांत ऑलआऊट, न्युझीलँड ७५ धावांनी विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2016 18:33 IST2016-03-26T16:51:20+5:302016-03-26T18:33:38+5:30

ईडन गार्डनवर रंगलेल्या सामन्यात न्युझीलँडने बांग्लादेशवर ७५ धावांनी विजय मिळवला.

Bangladesh won by 70 runs All out, New Zealand won by 75 runs | बांग्लादेश ७० धावांत ऑलआऊट, न्युझीलँड ७५ धावांनी विजयी

बांग्लादेश ७० धावांत ऑलआऊट, न्युझीलँड ७५ धावांनी विजयी

>ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. २६ - टी-२० विश्वचषकातील ईडन गार्डनवर रंगलेल्या सामन्यात न्युझीलँडने बांग्लादेशचे सर्व गडी अवघ्या ७० धावांत बाद करत त्यांच्यावर ७५ धावांनी विजय मिळवला. अवघ्या १५.४ षटकांत ७० धावा करत बांग्लादेशचे सर्व गडी तंबूत परतले. एलिऑट व सोधीने प्रत्येकी ३ तर मॅक्लेघॅन, सँटेनर व मॅकलमने १-१ बळी टिपला.
न्युझीलँडच्या १४६ धावांचा पाठलाग करताना बांग्लादेशचा कोणताही फलंदाज चमक दाखवू शकला नाही. शुवग्ता होम (१६), सबीर रेहमान (१२) व मोहम्मद मिथुन (११) यांच्याशिवाय इतर कोणताही खेळाडू दोन आकडी धावसंख्याही गाठू शकला नाही.
दरम्यान टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या न्युझीलँडने के. विल्यमसन (४२) आणि सी. मुन्रो(३५) यांच्या खेळीच्या जोरावर न्युझीलँडने २० षटकांत ८ गडी गमावून १४५ धावा केल्या. बांग्लादेशतर्फे मुस्ताफीझुरने ५ तर अल-अमीन-हुसैनने २ आणि मुर्तझाने १ बळी टिपत न्युझीलँडच्या डावाला खिंडार पाडले. 
टी-२० विश्वचषकातून बांग्लादेश आधीच बाहेर पडला आहे, मात्र आजचा सामना जिंकून तरी विजयी निरोप घेण्याचा त्यांचा निर्धार होता. मात्र न्युझीलँडच्या त्यांचा धुव्वा उडवल्याने बांग्लादेशची स्वप्ने धुळीला मिळाली. 

Web Title: Bangladesh won by 70 runs All out, New Zealand won by 75 runs