शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आॅस्ट्रेलियाकडून विंडीज पराभूत

By admin | Updated: December 13, 2015 02:42 IST

पुनरागमन करणारा वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिनसन याने भेदक मारा करीत आॅस्ट्रेलियाला पहिल्या कसोटीच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजवर एक डाव २१२ धावांनी

होबार्ट : पुनरागमन करणारा वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिनसन याने भेदक मारा करीत आॅस्ट्रेलियाला पहिल्या कसोटीच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजवर एक डाव २१२ धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला. गेल्या मार्चनंतर पहिली कसोटी खेळणाऱ्या पॅटिनसनने विंडीजच्या फलंदाजांना पाठोपाठ बाद केले. डेरेन ब्राव्होच्या शतकानंतरही (१०८) पहिल्या डावात विंडीजने केवळ २२३ धावांपर्यंतच मजल गाठल्याने आॅस्ट्रेलियाला ३६० धावांची आघाडी मिळाली. आॅस्ट्रेलियाने पहिला डाव ४ बाद ५८३ धावांवर घोषित केला. विंडीज संघ फॉलोआॅनच्या कात्रीत अडकल्यानंतर दुसऱ्या डावात या संघाची अवस्था आणखी बिकट होत गेली. दुसऱ्या डावात विंडीज संघ ३६.३ षटकांत १४८ धावा काढून बाद झाला. सलामीचा क्रेग ब्रेथवेट याने सर्वाधिक ९४ धावा केल्या; पण तो पराभव टाळू शकला नाही. पॅटिनसन याने २७ धावा देत ५ गडी बाद केले. हेजलवूड याने ४५ धावांत ४ गडी टिपले. विश्व कसोटी क्रमवारीत विंडीज संघ केवळ बांगला देश आणि झिम्बाब्वेपेक्षा वर आहे. १९९७ नंतर हा संघ एकही कसोटी सामना जिंकू शकला नाही. त्याआधी ब्राव्होने ९४ वरून पुढे सुरुवात करीत २० चौकारांसह ७ वे शतक गाठले. अखेरचा फलंदाज म्हणून बाद होण्याआधी १७७ चेंडूंचा सामना केला. हेजलवूडने सकाळी केमार रोच आणि जेरोम टेलर याला लागोपाठच्या चेंडूवर बाद केले. दोन्ही डावांत विंडीजचे प्रत्येकी ९ गडी बाद झाले. वेगवान गोलंदाज शेनन गॅब्रियल जखमी झाल्यामुळे फलंदाजीला येऊ शकला नाही. हा समाना पाहण्यासाठी तीन दिवसांत केवळ १५,३४२ प्रेक्षकांची उपस्थिती दर्शविल्याने होबार्टच्या कसोटी स्थळाविषयी शंका उपस्थित करण्यात येत आहे. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक : आॅस्ट्रेलिया : पहिला डाव ५८३ घोषीत; वेस्ट इंडिज पहिला डाव २२३ सर्वबाद ; वेस्ट इंडिज दुसरा डाव : क्रेग ब्रेथवेट गो. हेझलवूड ९४, आर. चंद्रिका झे. स्मिथ गो.पॅटिन्सन ०, ड्वेन ब्रावो गो. पॅटिन्सन ४, मार्लोन सॅम्युअल्स झे. वॉर्नर गो पॅटिन्सन ३, जेरीमाईन ब्लॅकवूड गो. पॅन्टिन्सन ०, दिनेश रामदिन झे. वॉर्नर गो. मिशेल मार्श ४, जेसन होल्डर झे. नेव्हिल गो. पॅटिन्सन १७, केमार रोच झे. नेव्हिल गो. हेझलवूड ३, जेरोमी टेलर झे. पॅटिन्सन गो. हेझलवूड १२, जोमेल वॅरिक्कन नाबाद ६, अवांतर ५, एकूण ३६.३ षटकांत १४८ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-२, २ -२०, ३-२४, ४-२४, ५-३०, ६-६०, ७-९१, ८-११७, ९-१४८ गोलंदाजी : जोश हेझलवूड १०.३-३-३३-३, जेम्स पॅटिन्सन ८-२-२७-५, पी.एम. सिडल ७-१-३४-०, मिशेल मार्श ७-०-३६-१, नॅथन लियॉन ४-०-१७-०