शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

भारताविरुद्ध आॅस्ट्रेलियाचे नेतृत्व वॉर्नरकडे?

By admin | Updated: December 13, 2015 23:23 IST

आॅस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर पुढच्या वर्षी १२ जानेवारीपासून भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेत दुखापतग्रस्त स्टिव्हन स्मिथच्या स्थानी

नवी दिल्ली : आॅस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर पुढच्या वर्षी १२ जानेवारीपासून भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेत दुखापतग्रस्त स्टिव्हन स्मिथच्या स्थानी आॅस्ट्रेलिया संघाचे कर्णधारपद भूषविण्याची शक्यता आहे.भारताविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेत आॅस्ट्रेलिया संघाचे कर्णधारपद वॉर्नर सांभाळण्याची शक्यता आहे. गुडघा व पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेला स्मिथ सध्या विंडीजविरुद्धच्या मालिकेत खेळत आहे. पुढच्या कसोटी सामन्यातही त्याच्या खेळण्याबाबत काही अडचण नाही. पण निवड समिती व वैद्यकीय स्टाफ त्याला विश्रांती देण्याबाबत विचार करीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आॅस्ट्रेलियन निवड समिती व वैद्यकीय स्टाफ स्मिथला भारताविरुद्धच्या मालिकेदरम्यान विश्रांती देण्याचा निर्णय घेऊ शकते. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या टी-२० विश्वकप स्पर्धेदरम्यान स्मिथ फिट असावा, असे संघव्यवस्थापनाला वाटते. बिग बॅश लीगच्या सुरुवातीच्या फेरीतील लढतींमध्येही स्मिथ खेळणार नाही. त्याला अ‍ॅशेस मालिकेदरम्यान गुडघा व पाठीच्या दुखापतीने सतावले होते. आॅस्ट्रेलियाचे प्रशिक्षक व निवडकर्ते डॅरेन लेहमन यांनीही स्मिथला काही कालावधीसाठी विश्रांती देण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले. लेहमन म्हणाले, ‘‘स्मिथ २६ वर्षांचा असल्याचे म्हणतो, पण होबार्टमध्ये त्याचा खेळ बघितल्यानंतर तो ३६ वर्षांचा भासत होता. कर्णधारपद सांभाळण्याचे दडपण मोठे असते. बीबीएलमध्ये तो खेळणार नाही. माझ्या मते, दोन आठवड्यांची विश्रांती पुरेशी ठरेल.’’आॅस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक म्हणाले, ‘‘वन-डे मालिका आमच्यासाठी महत्त्वाची आहे. त्यानंतर टी-२० विश्वकप स्पर्धा आहे. त्यामुळे त्याच्यासाठी ब्रेक दिसत नाही. मी डॉक्टर नाही.’’ आॅस्ट्रेलियाच्या यजमानपदाखाली पुढील वर्षी जानेवारी महिन्यात भारतीय संघ पाच वन-डे व तीन टी-२० सामने खेळणार आहे.(वृत्तसंस्था)