शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

आॅस्ट्रेलिया-इंग्लंड जेतेपदासाठी झुंजणार

By admin | Updated: January 31, 2015 23:20 IST

रविवारी तिरंगी वन-डे सामन्यांच्या मालिकेच्या अंतिम लढतीत यजमान आॅस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यादरम्यान जेतेपदासाठी अंतिम झुंज रंगणार आहे.

तिरंगी मालिका : अंतिम लढत आजपर्थ : विश्वकप स्पर्धेच्या सलामी लढतीत खेळण्यापूर्वी रविवारी तिरंगी वन-डे सामन्यांच्या मालिकेच्या अंतिम लढतीत यजमान आॅस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यादरम्यान जेतेपदासाठी अंतिम झुंज रंगणार आहे. रविवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीकडे उभय संघ विश्वकप स्पर्धेसाठी सरावाची उत्तम संधी म्हणून बघत आहेत. चार सामन्यांत १५ गुणांची कमाई करणाऱ्या जॉर्ज बेलीच्या नेतृत्वाखालील आॅस्ट्रेलिया संघाला तिरंगी स्पर्धेत जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. मिशेल जॉन्सन फिट असून रविवारच्या सामन्यात खेळणार असल्याचे वृत्त आहे. जॉन्सनच्या समावेशामुळे आॅस्ट्रेलियाची गोलंदाजीची बाजू अधिक मजबूत झाली आहे. नियमित कर्णधार मायकल क्लार्कच्या अनुपस्थितीतही आॅस्ट्रेलिया संघ बलाढ्य भासत आहे. तिरंगी मालिकेत आॅस्ट्रेलियाची फलंदाजी व गोलंदाजी उल्लेखनीय ठरली आहे. कर्णधार बेलीचा फॉर्म आॅस्ट्रेलिया संघासाठी चिंतेचा विषय आहे. त्याला दोन डावांमध्ये अनुक्रमे १० व ५ धावा करता आल्या. निलंबनाच्या कारवाईमुळे त्याला होबार्टमध्ये इंग्लंडविरुद्धच्या लढतीत खेळता आले नव्हते. यजमान संघाची भिस्त जॉन्सन व मिशेल स्टार्क यांच्या गोलंदाजीवर अवलंबून आहे दुसऱ्या बाजूचा विचार करता श्रीलंकेमध्ये वन-डे मालिकेत ५-२ ने पराभव स्वीकारणारा इंग्लंड संघ या वेळी वेगळा भासत आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेनंतर अ‍ॅलिस्टर कुकची कर्णधारपदावरून उचलबांगडी करीत संघाचे नेतृत्व इयोन मोर्गनकडे सोपविण्यात आले. आॅस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर इंग्लंड संघाच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. इंग्लंडचे फलंदाज फॉर्मात असल्याचे दिसून येत आहे. विशेषत: इयान बेलच्या बॅटमधून धावा निघत आहेत. त्याने सराव सामन्यांत चांगली कामगिरी केली होती. तिरंगी मालिकेत इंग्लंडला आॅस्ट्रेलियाविरुद्ध दोनदा पराभवाला सामोरे जावे लागले, पण त्यांनी भारताविरुद्ध दोन्ही सामन्यांत विजय मिळविण्याचा पराक्रम केला. ब्रिस्बेनमध्ये भारताविरुद्ध ९ गडी राखून विजय मिळविणाऱ्या इंग्लंडने शुक्रवारी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील संघाचा ३ गडी राखून पराभव करीत अंतिम फेरीत स्थान मिळविले. अंतिम लढतीत इंग्लंडपुढे कामगिरीत सातत्य राखण्याचे आव्हान आहे. या स्पर्धेत विजय मिळविणाऱ्या संघाला विश्वकप स्पर्धेत सहभागी होताना आत्मविश्वास उंचावण्यास मदत मिळेल. (वृत्तसंस्था)