अर्जेंटिना उपांत्यपूर्व फेरीत

By Admin | Updated: June 22, 2015 01:26 IST2015-06-22T01:26:21+5:302015-06-22T01:26:21+5:30

कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिनाने गॉंझेलो हिगुएन याने नोंदविलेल्या एकमेव गोलच्या जोरावर जमैकाचा १-० ने पराभव करीत स्पर्धेच्या उपांत्यपूर्व

Argentina in the quarter-finals | अर्जेंटिना उपांत्यपूर्व फेरीत

अर्जेंटिना उपांत्यपूर्व फेरीत

सेटीयागो : कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिनाने गॉंझेलो हिगुएन याने नोंदविलेल्या एकमेव गोलच्या जोरावर जमैकाचा १-० ने पराभव करीत स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या विजयाने बी गटात अर्जेंटिना अव्वल स्थानी गेली आहे. तर या पुर्वीच उरुग्वेने देखील अंतिम आठ संघात आपले स्थान पक्के केले आहे. अर्जेंटिनाचा पुढील सामना आता इक्वेडोर अथवा ग्रुप ‘क’ मधील तिसऱ्या स्थानावरील संघाशी होईल.
विश्वचषक स्पर्धा उपविजेत्या अर्जेंटिनाला फिफा क्रमवारीत आपल्यापेक्षा ६२ स्थान मागे असलेल्या संघावर निर्विवाद वर्चस्व राखण्यात अपयश आले. अकराव्या मिनिटाला अर्जेंटीनाने जमैकाच्या गोलजाळ््याच्या दिशेने वेगवान चाल रचली. एंजेल डी मारिया याने हिगुएन याच्याकडे पास दिला. हिगुएनेने कोणतीही चूक न करता जमैकाच्या बचाव फळीतील खेळाडूंना चकमा देत चेंडू गोलजाळ््यात मारला.
ब गटात उरुग्वे व पॅराग्वे संघातील सामना १-१ असा बरोबरीत सुटला असला तरी उरुग्वेने अंतिम आठ संघात स्थान मिळविण्यात यश मिळविले आहे.

Web Title: Argentina in the quarter-finals