अनुष्का ‘अनलकी’!

By Admin | Updated: March 27, 2015 01:44 IST2015-03-27T01:44:10+5:302015-03-27T01:44:10+5:30

आॅस्ट्रेलियाविरुद्ध भारताला पाठिंबा देण्यासाठी मैदानावर पोहोचलेली बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही विराटसाठी ‘लकी चार्म’ ठरू शकली नाही.अनुष्का आणि विराटचे प्रेमप्रकरण जगजाहीर आहे.

Anushka 'Unlucky'! | अनुष्का ‘अनलकी’!

अनुष्का ‘अनलकी’!

आॅस्ट्रेलियाविरुद्ध भारताला पाठिंबा देण्यासाठी मैदानावर पोहोचलेली बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही विराटसाठी ‘लकी चार्म’ ठरू शकली नाही.अनुष्का आणि विराटचे प्रेमप्रकरण जगजाहीर आहे. अनुष्काला आॅस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू असताना टीव्ही स्क्रीनवर दाखविण्यात आले नव्हते. भारतीय डावात शिखर धवन बाद होताच विराट फलंदाजीला आला तेव्हा कॅमेऱ्याचा झोत अनुष्कावर टाकण्यात आला.

अनुष्का प्रेक्षकांमध्ये बसून हात हलवित होती. विराटसाठी ती ‘लकी चार्म’ ठरेल आणि तो मोठी खेळी करू शकेल, असा अनेकांचा समज झाला होता; पण केवळ एक धाव काढणारा विराट मिशेल जॉन्सनच्या चेंडूवर यष्टिरक्षक ब्रॅड हॅडिनकडे झेल देत तंबूत परतला. त्याआधी क्षेत्ररक्षणादरम्यान त्याने दोनदा चुका केल्या. एकदा फलंदाजाला धावबाद करताना चुकला व नंतर जॉन्सनचा मिडविकेटवर त्याने झेल सोडला .
स्काय कलर रेषेदार ‘वन पिस’ पेहरावात आलेली अनुष्का व्हीआयपी गॅलरीत मित्रांसोबत बसली होती. विराट बाद होताच कॅमेरा पुन्हा एकदा अनुष्काकडे फिरला. ती स्तब्ध होती. चेहऱ्यावर हात असलेल्या अनुष्काच्या चेहऱ्यावर निराशा झळकत होती. भारतीय गोटात शांतता पसरली.
बांगलादेशविरुद्ध सामन्याच्या आधी विराटने अनुष्काचा एनएच-१० हा सिनेमा पाहिला. तिच्या अभिनयाचे कौतुक करीत त्याने ‘माय लव्ह’ असे टिष्ट्वट केले होते. त्या सामन्यात तो तीन धावांवर बाद झाला. आज तो एका धावेवर परतला.

Web Title: Anushka 'Unlucky'!