पाकिस्तानविरोधात मॅच जिंकल्यानंतर अनुष्का शर्माचा विराटला मेसेज

By Admin | Updated: March 20, 2016 20:54 IST2016-03-20T20:54:59+5:302016-03-20T20:54:59+5:30

भारताला विजय मिळवता आला. भारताच्या या विजयानंतर अभिनेत्री अनुष्का शर्माने चक्क विराटला मेसेज केल्याची बातमी आहे.

Anushka Sharma's Viratla Message After winning a match against Pakistan | पाकिस्तानविरोधात मॅच जिंकल्यानंतर अनुष्का शर्माचा विराटला मेसेज

पाकिस्तानविरोधात मॅच जिंकल्यानंतर अनुष्का शर्माचा विराटला मेसेज

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - टीम इंडियाचा डॅशिंग बॅट्समन म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद असल्याचं समोर आलं. एवढेच नाही तर दोघांचाही ब्रेक-अप झाल्याच्याही बातम्या आल्या त्यासोबतच दोघांनीही सोशल नेटवर्किंग साईट्सवर एकमेकांना अनफॉलोव्ह केलं. मात्र, आता या दोघांमधील वाद मिटणार असल्याचं कळतयं.


टी-२० वर्ल्डकपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या मॅचमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला हरविण्याचा सिलसिला सुरुच ठेवला. शनिवारी कोलकातामध्ये झालेल्या या मॅचमध्ये विराट कोहली याने मोठी कामगिरी बजावली.


विराट कोहली याने संयम ठेवत धडाकेबाज बॅटींग केली आणि ३७ बॉल्समध्ये ७ फोर आणि १ सिक्सर मारत नॉट आऊट ५५ रन्स केले. त्यामुळे भारताला विजय मिळवता आला. भारताच्या या विजयानंतर अभिनेत्री अनुष्का शर्माने चक्क विराटला मेसेज केल्याची बातमी आहे.  bollywoodlife.com ने दिलेल्या वृत्तानुसार, अनुष्का शर्मानं विराट कोहलीला मेसेज करून विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत तसेच अभिनंदनही केलं आहे


विराट आणि अनुष्का यांच्यात ब्रेकअप झाल्याच्या बातम्या आल्या होत्या आणि त्यानंतर अनुष्का क्रिकेट स्टेडियममध्ये मॅच पाहतानाही दिसली नव्हती. आणि आता पाकिस्तानसोबत मॅच जिंकल्यानंतर विराटला अनुष्काने मेसेज केला आहे. त्यामुले विराट आणि अनुष्का यांच्यामध्ये पुन्हा पॅचअप होणार का? यासंदर्भात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

Web Title: Anushka Sharma's Viratla Message After winning a match against Pakistan