अनुष्का विराटसोबत नाही : राजीव शुक्ला

By Admin | Updated: July 24, 2014 01:19 IST2014-07-24T01:19:31+5:302014-07-24T01:19:31+5:30

इंग्लंड दौ:यावर असलेला क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत अभिनेत्री अनुष्का शर्मा असल्याचे वृत्त भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) फेटाळून लावले आह़े

Anushka is not with Virat: Rajeev Shukla | अनुष्का विराटसोबत नाही : राजीव शुक्ला

अनुष्का विराटसोबत नाही : राजीव शुक्ला

कानपूर : इंग्लंड दौ:यावर असलेला क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत अभिनेत्री अनुष्का शर्मा असल्याचे वृत्त भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) फेटाळून लावले आह़े अनुष्काला इंग्लंड दौ:यावर घेऊन जाण्याची परवानगी विराटला दिलेली नसून, ती सध्या विराटसोबत आहे किंवा नाही हेसुद्धा मंडळाला माहीत नाही, अशी माहिती मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली आह़े 
स्टार फलंदाज विराट कोहली याने इंग्लंड दौ:यावर अनुष्का शर्माला घेऊन जाण्यासाठी बीसीसीआयकडे परवानगी मागितली होती, असे वृत्त माध्यमांमध्ये आले होत़े हे दोघे एकाच हॉटेलमध्ये थांबले असल्याचे या वृत्तात म्हटले होत़े मात्र, बीसीसीआयचे उपाध्यक्ष शुक्लांनी हे वृत्त फेटाळले.
ते म्हणाले की, बीसीसीआय केवळ खेळाडूंच्या पत्नीला परदेशी दौ:यावर जाण्याची परवानगी देत़े यासाठी खेळाडूंना मंडळाकडून अधिकृतरीत्या परवानगी घ्यावी लागत़े बीसीसीआयच्या इतिहासात एकाही क्रिकेटपटूच्या मैत्रिणीला संघासोबत दौ:यावर घेऊन जाण्याची परवानगी मंडळाने दिलेली नाही, असे शुक्ला यांनी सांगितल़े (वृत्तसंस्था)

 

Web Title: Anushka is not with Virat: Rajeev Shukla