शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ललिता बाबरनंतर आता श्रद्धा घुलेही अडकणार लग्नबंधनात

By admin | Updated: May 17, 2017 18:27 IST

धावपटू ललिता बाबरनंतर आता अकोलेची सुवर्णकन्या श्रद्धा घुले हिचेही शुभमंगल ठरले आहे़. त्यामुळे महाराष्ट्रातील दोन महिला अ‍ॅथलिट खेळाडू या वर्षी विवाह बंधनात अडकणार आहेत़.

आॅनलाईन लोकमतअकोले (अहमदनगर), दि़ १७ - धावपटू ललिता बाबरनंतर आता अकोलेची सुवर्णकन्या श्रद्धा घुले हिचेही शुभमंगल ठरले आहे़. त्यामुळे महाराष्ट्रातील दोन महिला अ‍ॅथलिट खेळाडू या वर्षी विवाह बंधनात अडकणार आहेत़. प्रवरा काठच्या मातीतून घेतलेल्या उडीने आंतरराष्ट्रीय पातळीवर उंच व तिहेरी उडी क्रीडा प्रकारात गोल्ड मेडल मिळवलेली श्रद्धा भास्कर घुले ही गुजरात केडरमधील जिल्हाधिकारी पदावर रुजू होत असलेल्या रविंद्र ज्ञानेश्वर खताळे यांच्याशी विवाहबद्ध होत आहे़ श्रद्धा घुले हिने आत्तापर्यंत विविध स्पर्धांमध्ये ६१ सुवर्णपदकांसह ११४ पदकांची कमाई केली आहे़ गुरुवारी सायंकाळी संगमनेर येथील मालपाणी हेल्थ क्लबमध्ये श्रद्धा घुले हिच्या साखरपुड्याचा कार्यक्रम होत आहे़. श्रध्दा घुलेचा विवाह सिन्नर तालुक्यातील पाटोळे येथील रविंद्र ज्ञानेश्वर खताळे यांच्याशी निश्चित झाला आहे़ रविंद्र खताळे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन ते गुजरात केडरमध्ये जिल्हाधिकारी या पदावर कार्यरत होत आहेत. जिल्हाधिकारी पदाचा प्रशिक्षण कालावधी त्यांनी पूर्ण केला आहे. महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती पुरस्काराने श्रद्धा घुलेचा गौरव केला आहे. युवा राष्ट्रकुल स्पर्धेत सुर्वणकन्या ठरलेल्या श्रध्दाने आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय व विद्यापीठ पातळीवर तिहेरी व उंच उडीत ६३ सुवर्ण (गोल्ड), २४ रौप्य (सिल्वर), २७ कास्य (ब्रॉन्झ) असे एकूण ११४ पदके पटकावली आहेत. २००७ साली पुणे येथे युवा राष्ट्रकुल स्पर्धेत तिहेरी उडीत तिने अगोदरचे सर्व विक्रम मोडीत काढत १३.११ मीटर उडी घेत विश्वविक्रम प्रस्थापित केला़ २०१४ साली यशवंतराव चव्हाण क्रीडा युवती पुरस्काराने तर महाराष्ट्राचा सर्वोच्च शिवछत्रपती पुरस्काराने तिचा गौरव करण्यात आला आहे. पटियाला येथे ‘बेस्ट अ‍ॅथलेटिक वूमन’ अवॉर्ड तिला प्राप्त झाला आहे.