शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणिस्तानची विजयी सुरुवात

By admin | Updated: March 9, 2016 05:14 IST

अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार ठरलेल्या लढतीत अफगाणिस्तानने स्कॉटलंडचा १४ धावांनी पराभव केला आणि विश्वकप टी-२० स्पर्धेत क्वालिफायरमध्ये विजयी सुरुवात केली.

भास्कर चौधरी,  नागपूरअखेरच्या षटकापर्यंत रंगतदार ठरलेल्या लढतीत अफगाणिस्तानने स्कॉटलंडचा १४ धावांनी पराभव केला आणि विश्वकप टी-२० स्पर्धेत क्वालिफायरमध्ये विजयी सुरुवात केली. या निकालामुळे अफगाणिस्तान संघाने सुपर टेनमध्ये स्थान मिळविण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या अफगाणिस्तान संघाने ५ बाद १७० धावांची आव्हानात्मक मजल मारली आणि प्रत्युत्तरात खेळणाऱ्या स्कॉटलंड संघाचा डाव ५ बाद १५६ धावांत रोखला.लक्ष्याचा पाठलाग करताना स्कॉटलंड संघातर्फे जॉर्ज मुन्से (४१), केली कोएत्झर (४०), मॅच मचान ( ३६) व पीटर मोमसेन (नाबाद १७) यांनी चांगली खेळी केली; पण विजयासाठी त्यांचे प्रयत्न अपुरेच पडले. अफगाणिस्तान संघातर्फे राशीद खानने दोन, तर मोहंमद नबी व समीउल्ला शेनवारी यांनी प्रत्येकी एक बळी घेऊन स्कॉटलंडचा डाव रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याआधी, सलामीवीर मोहंमद शहजाद आणि कर्णधार असगर स्टेनिकजई यांनी डाव सावरल्याने अफगाणिस्तानने ५ बाद १७० धावांची मजल मारली. शहजादने ३९ चेंडू टोलवून ५ चौकार आणि ३ षटकारांसह सर्वाधिक ६१ धावा ठोकल्या. अफगाणिस्तानचा कर्णधार असगरने ५० चेंडूंत ५५ धावांचे नाबाद योगदान दिले. त्याने ४८ चेंडूंत अर्धशतक नोंदविले. आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यातील हे सर्वांत कूर्मगती अर्धशतक ठरले. असगरने २ चौकार आणि १ षटकार मारला. सलामीचा नूरअली जादरान याने १२ चेंडूंत १७ धावा केल्या. तो तिसऱ्या षटकात बाद झाल्यानंतर शहजाद आणि असगर यांनी धावसंख्येला आकार देऊन दुसऱ्या गड्यासाठी १०.१ षटकांत ८२ धावांची भागीदारी केली. गुलाबदीन नैब याने १२ आणि अखेरच्या क्षणी आलेला सफिउल्लाहने ५ चेंडूंवर ३ चौकारांसह १४ धावांचे योगदान दिले. स्कॉटलंडकडून अ‍ॅलेस्टर इव्हान्स, मार्क बाट आणि जोस डेव्ही यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.संक्षिप्त धावफलकअफगाणिस्तान : २० षटकांत ५ बाद १७० धावा ( मो. शाहबाज ६१, असगर स्टेनिकजई नाबाद ५५, नूर अली १७, शफिकुल्लाह नाबाद १४, गुलबदीन नैब १२, वाट, डेव्ही व इव्हान्स प्रत्येकी एक बळी).स्कॉटलंड : २० षटकांत ५ बाद १५६ (मुन्से ४१,कोएत्झर ४०, मचान २०, मोमसेन नाबाद १७; राशीद खान २-२८, मोहंमद नबी १-२७, समीउल्ला शेनवारी १-२१).