शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आदित्य मेहताला पराभवाचा धक्का

By admin | Updated: March 14, 2015 01:50 IST

येथे सुरू असलेल्या दुसऱ्या इंडियन ओपन स्नूकर जागतिक मानांकन स्पर्धेत यजमान भारताला स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतच मोठा धक्का बसला.

मुंबई : येथे सुरू असलेल्या दुसऱ्या इंडियन ओपन स्नूकर जागतिक मानांकन स्पर्धेत यजमान भारताला स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतच मोठा धक्का बसला. आदित्य मेहताला इंग्लंडच्या रिकी वॉल्डेनने पराभूत केल्याने भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. त्याचवेळी थायलंडच्या थेपचैया उन-नूह याने तिसऱ्या फेरीत आगेकूच केल्याने त्याच्या रूपाने स्पर्धेत एकमेव आशियाई खेळाडूचे आव्हान कायम राहिले आहे.बिलियडर््स अ‍ॅण्ड स्नूकर फेडरेशन आॅफ इंडियाच्या (बीएसएफआय) वतीने सुरू असलेल्या या स्पर्धेत आदित्यला रिकी विरुद्ध २-४ असा पराभव पत्करावा लागला. पहिले तीन फ्रेम गमावल्याने आदित्य रिकी हा सुरुवातीलाच ०-३ अस पिछाडीवर पडला होता. यावेळी आदित्य दबावाखाली असल्याचे जाणवले. मात्र सलग दोन फ्रेम जिंकताना आदित्यने रिकीला जोरदार प्रत्युत्तर देताना २-३ अशी पिछाडी कमी केली. या वेळी आदित्य जबरदस्त पुनरागमन करणार असे दिसत होते. मात्र जागतिक क्रमवारीत ८व्या स्थानी असलेल्या वॉल्डेनने आपला दर्जा सिद्ध करताना सहाव्या फ्रेममध्ये निर्णायक बाजी मारीत ७०(६३)-०, ७८(४२)-२७, ७७-१३, १८-७३, ०-७६(४६), ८१(४३)-१ असा विजय मिळवला.दुसऱ्या बाजूला स्पर्धेत एकमेव आशियाई खेळाडू म्हणून आव्हान कायम ठेवलेल्या उन-नूह याने वेल्सच्या कसलेल्या जेमी जोन्सचे कोणतेही दडपण न घेता ४-१ अशी सहज आगेकूच केली. पहिला फ्रेम गमावून पिछाडीवर पडलेल्या उन-नूह याने जबरदस्त पुनरागमन करताना सलग चार फ्रेम जिंकण्याची किमया करीत १७-६३, ७३९५५)-१०, ६९-५८, ७९(५१)-१, १२३(१२३)-४ असा शानदार विजय मिळवला. (क्रीडा प्रतिनिधी)