शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
3
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
4
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
5
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
6
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
7
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
8
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
9
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
10
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
11
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
12
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
13
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
14
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
15
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
16
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
17
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
18
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
19
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
20
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
Daily Top 2Weekly Top 5

टेनिससाठी 2020 असेल उत्सुकतेचे वर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 23:38 IST

महिला एकेरीपाठोपाठ पुरुष एकेरीतही विक्रमांची संधी

ठळक मुद्देसेरेना वारंवार हुलकावणी देणारा विक्रम गाठणार का?फेडरर आपली आघाडी वाढवणार का?नदाल विजेतेपदांबाबत फेडररला गाठणार का?

ललित झांबरे : आंतरराष्ट्रीय टेनिस जगतासाठी सर्वात महत्त्वाच्या ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या हिशेबाने आणखी एक वर्ष सरले असले तरी येणारे वर्ष अतिशय मनोरंजक आणि भारी उत्सुकतेचे ठरणार आहे. ते कसे काय? तर आता महिला टेनिस पाठोपाठ पुरुषांच्या टेनिसमध्येही सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेतेपदे कोण पटकावणार याची स्पर्धा रंगणार आहे कारण सेरेना विल्यम्स यंदासुध्दा मार्गारेट कोर्टच्या सर्वाधिक 24 ग्रँडस्लॅम विजेतेपदांच्या विक्रमाची बरोबरी करु शकली नाही आणि इकडे रॉजर फेडररसुध्दा आपल्या 20 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदांमध्ये भर टाकू शकला नाही. मात्र राफेल नदाल यंदा फ्रेंच ओपन व यूएस ओपन जिंकून त्याच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलाय.म्हणून 2020 मध्ये सेरेना एखादी ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकून मार्गारेट कोर्टच्या विक्रमाशी बरोबरी करेल का? 19 ग्रँडस्लॅम विजेतेपदे नावावर असणारा राफेल नदाल आणखी एक-दोन स्पर्धा जिंकून फेडररला मागे टाकणार का? की फेडरर एखादी स्पर्धा जिंकून आपल्या ग्रँडस्लॅम विजेतेपदांची आघाडी आणखी वाढवेल, याची उत्सुकता आहे. म्हणून 2020 हे टेनिससाठी मनोरंजक वर्ष ठरणार आहे.फेडरर हा 2018 च्या ऑस्ट्रेलियन ओपनपासून ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकू शकलेला नाही. त्यानंतरच्या सात पैकी चार ग्रँडस्लॅमअजिंक्यपदे नोव्हाक जोकोवीचच्या नावावर लागली आहेत तर तीन अजिंक्यपदे राफेल नदालच्या नावावर लागली. त्यामुळेच पुरुष एकेरीतील सर्वाधिक ग्रँडस्लॅम अजिंक्यपदांच्या स्पर्धेची रंगत अधिक वाढली आहे.याचप्रमाणे महिला एकेरीतही सेरेना विल्यम्स जानेवारी 2017 च्या ऑस्ट्रेलियन ओपन अजिंक्यपदापासून 23 ग्रँडस्लॅम विजेतेपदांवरच अडकून पडली आहे. त्यानंतर सात ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळताना ती चार वेळा अंतिम फेरीतही पोहोचली पण प्रत्येकवेळी विजेतेपदाने तिला हुलकावणीच दिली आहे. त्यामुळे 2020 मध्ये तरी सेरेना ही अपयशाची मालिका मोडेल काय याची उत्सुकता आहे.2020 साठी टेनिसबाबत आणखी एक उत्सुकतेचा विषय म्हणजे ऑलिम्पिक सामने. रॉजर फेडररने टेनिस जगतातील जवळपास प्रत्येक स्पर्धा जिंकली आहे पण ऑलिम्पिक सुवर्ण पदक अद्याप त्याला जिंकता आलेले नाही. ते जिंकून फेडरर आपले शोकेस 2020 मध्ये पूर्ण करणार का, याचीसुध्दा उत्सुकता असेल.

टॅग्स :TennisटेनिसRoger fedrerरॉजर फेडरर