शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

कसाऱ्यात बिबट्याच्या हल्ल्यात तरुणी जखमी

By admin | Updated: November 10, 2015 00:42 IST

शुक्रवारी रात्री पेढ्याचापाडा येथे भरवस्तीत रात्री ८ च्या सुमारास शिरकाव करून नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या रुगी धापटे (१८) या तरुणीवर हल्ला चढविला.

कसारा : शुक्रवारी रात्री पेढ्याचापाडा येथे भरवस्तीत रात्री ८ च्या सुमारास शिरकाव करून नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या रुगी धापटे (१८) या तरुणीवर हल्ला चढविला. अचानक झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यानंतर या तरुणीने बचावात्मक पवित्रा घेऊन आरडाओरड केली. तिच्यासोबत असलेल्या तिच्या बहिणीने तिला बिबट्याच्या तावडीतून सोडविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सुमारे १५ ते २० मिनिटे बिबट्या व पीडित तरुणी यांच्यात झुंज सुरू असताना ग्रामस्थांनी त्याला पिटाळून लावण्यासाठी प्रयत्न केले. अखेर, २० मिनिटांच्या झुंजीनंतर सदर तरुणीने केलेल्या प्रतिकारामुळे त्याने धूम ठोकली. परिणामी, या हल्ल्यात पीडित तरुणी व तिची बहीण जखमी झाली आहे. या प्रकारानंतर वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन जखमी तरुणीला कसारा प्राथमिक उपचारानंतर उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे दाखल केले. दरम्यान, या प्रकारानंतर संतप्त ग्रामस्थांनी कसारा येथील वन विभागाच्या वनपरिक्षेत्र कार्यालयावर हल्ला करून तोडफोड केली. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर, घटनास्थळी कसारा पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. (प्रतिनिधी)याप्रकाराची माहिती कळताच शिवसेना आमदार व आदिवासी विकास कमिटीचे अध्यक्ष रुपेश म्हात्रे यांच्यासह माजी आमदार दौलत दरोडा तालुका प्रमुख मारुती धिर्डे यांनी पेढ्याचा पाडा येथे धाव घेऊन धापटे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत केली. तसेच आदिवासी विकास प्रकल्पामार्फत २५ हजार रुपये मदत देण्याचे आश्वासन दिले. यावेळी युवा सेनेचे भाऊ दरोडा, रमेश भोईर, प्रवीण सूर्यराव, शिवसेनेचे कुलदीप धानके, सुभाष विशे, विठ्ठल भगत यांच्यासह तहसीलदार अविनाश कोष्टी, प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. काशिनाथ पोकळा यांनीही धापटे कुटुंबियांची भेट घेऊन मदतीचा हात दिला.दरम्यान, बिबट्याच्या धुमाकुळीमुळे वन विभागाने काही भागांत कॅमेरे, पिंजरे यासह वन कर्मचाऱ्यांची गस्त तैनात केली आहे. परंतु, अपुऱ्या साधनसामग्री व अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे गेल्या महिन्यापासून बिबट्या वन विभागाच्या हातावर तुरी देऊन इतरत्र धूम ठोकून वन्यजीव व लहान मुले, वयोवृद्ध यांना भक्ष्य करीत आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेनंतर रात्री शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन जखमी तरुणींची विचारपूस करून तिला तत्काळ मदत देण्याची सूचना वन विभागास केली.