शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बविआकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

By admin | Updated: October 3, 2014 23:07 IST

वसई :महाराष्ट्राच्या राजकारणात जिल्हा स्तरवरील प्रभावी पक्ष साकार करण्याचा प्रय} आजवर अनेकदा झाला. परंतु त्याला फारसे यश मिळाले नाही.

विशेष प्रतिनिधी
वसई :महाराष्ट्राच्या राजकारणात जिल्हा स्तरवरील प्रभावी पक्ष साकार करण्याचा प्रय} आजवर अनेकदा झाला. परंतु त्याला फारसे यश मिळाले नाही. या पाश्र्वभूमीवर नव्याने साकार झालेल्या पालघर जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात प्रबळ लढत देऊ पाहणा:या बहुजन विकास आघाडीच्या कामगिरीकडे संपूर्ण राज्याचे मतदार आणि राजकीय पक्ष यांचे लक्ष वेधले गेले आहे.
सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांचे चिरंजीव विनय कोरे यांनी जनसुराज्य नावाचा पक्ष स्थापन केला परंतु त्यांचा स्वत:चा आमदारकीचा विजय सोडला तर त्या पक्षाचा कोणताही ठसा त्याला उमटवता आला नाही. अशीच अवस्था राज्य पक्ष मग विभागीय पक्ष मग जिल्हास्तरीय पक्ष अशी घसरण झालेल्या शेकापचीही झाली. कालांतराने तो रायगड जिल्ह्यापुरता मर्यादीत झाला परंतु. त्यातही पुढे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी सेंधमारी केली. त्यामुळे जिल्हापातळीवरील प्रभावी पक्ष ही संकल्पनाच महाराष्ट्राच्या राजकारणातून मोडीत निघाली ती आता बविआच्या रुपाने साकार होऊ पाहते आहे. जर ती यशस्वी झाली तर अशा पक्षांचे महाराष्ट्रात पेव फुटू शकते.
गेल्या विधानसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली बहुजन विकास आघाडीने नालासोपारातून व बोईसरमधून विजय मिळविला होता. वसईत त्यांचा निसटता पराभव झाला. परंतु आता स्वत: बविआचे सूत्रधार वसईतून त्यांचे पुत्र नालासोपा:यातून आघाडीचे मावळते आमदार विलास तरे बोईसरमधून तर अन्य तीन मतदारसंघातून आघाडीचे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादीने तर वसई, नालासोपारा आणि अन्य एका मतदारसंघात बविआ विरोधात उमेदवारच दिलेले नाहीत. अशा स्थितीत या विधानसभा निवडणुकीत बविआची कामगिरी कशी होते? याकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. तसेच सेना, भाजपा आणि काँग्रेस, राष्ट्रवादी या सगळ्याच पक्षांचे नेते निकालानंतर ती आपल्याकडे वळावी यासाठी आतापासूनच प्रय}शील आहेत.
 
4प्रत्येक मतदारसंघात तगडा उमेदवार द्यायचा प्रसंगी तो आपल्याकडे नसेल तर अन्य पक्षातून फोडून आपल्या पक्षात आणायचा आणि द्यायचा अशी हाराफेरी करणा:या राष्ट्रवादीने नालासोपारा, वसई आणि पालघर या मतदारसंघात उमेदवारच दिलेला नाही कारण जर बविआला भरघोस मिळाले तर तिचे आमदार आपल्याकडे वळावेत, असा राष्ट्रवादीचा हेतू आहे.
 
4आजर्पयत बविआची साथसंगत काँग्रेससोबतच राहिली आहे. अशा स्थितीत पालघरमधील सहाही मतदारसंघात उमेदवार उभे केले असले तरी मागील पाश्र्वभूमी लक्षात घेता यावेळीही तिला आपण आपल्याकडे वळवू शकू असा विश्वास काँग्रेसला आहे.
 
4शिवसेनेने मात्र बविआपासून फटकून राहण्याचा पवित्र घेतला असला तरी भाजपा मात्र गरज लागलीच तर बविआचे सहकार्य घेण्याच्या मूडमध्ये आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते बविआच्या सूत्रधारांच्या संपर्कात असले तरी प्रत्यक्षात पक्षीय बलाबल सिद्ध झाल्यानंतरच बविआ कुठे हे कळू शकेल.