शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग समित्या रखडल्या

By admin | Updated: October 29, 2015 23:52 IST

महापालिकेच्या निवडणुका होवून सहा महिने झाल्यानंतरही अद्याप प्रभाग समित्यांची रचना झालेली नाही. आॅगस्टमध्ये घाई गडबडीमध्ये केलेल्या रचनेस मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे

नामदेव मोरे, नवी मुंबईमहापालिकेच्या निवडणुका होवून सहा महिने झाल्यानंतरही अद्याप प्रभाग समित्यांची रचना झालेली नाही. आॅगस्टमध्ये घाई गडबडीमध्ये केलेल्या रचनेस मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. दोन महिन्यांनंतरही स्थगिती कायम असल्यामुळे प्रभागांमधील विकासकामे ठप्प झाली असून नगरसेवकांनी राज्य शासनाच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका एप्रिलमध्ये झाल्या आहेत. ९ मे रोजी महापौरांची निवड करण्यात आली. त्यानंतर एक महिन्यामध्ये प्रभाग समित्यांची नियुक्ती होणे आवश्यक होते. यापूर्वीच्या पंचवार्षिकमध्ये सहा प्रभाग समित्या होत्या. यावेळी नगरसेवकांची संख्या १११ असल्यामुळे ८ समित्यांची रचना केली आहे. २० आॅगस्टमध्ये झालेल्या तहकूब सर्वसाधारण सभेमध्ये प्रभाग समित्यांची रचना केली होती. परंतु तहकूब समित्यांमध्ये आयत्या वेळचे विषय आणता येत नसल्याचे सांगत शिवसेना व भाजपा नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार टाकला होता. बेलापूर मतदार संघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ दखल घेवून थेट आयुक्त दिनेश वाघमारे यांना फोन करून स्थगिती दिली होती. दोन महिन्यांचा कालावधी गेल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी अद्याप स्थगिती उठविलेली नाही. यामुळे अद्याप प्रभाग समित्यांची फेररचना होवू शकलेली नाही. महापालिकेने अनावश्यक खर्च कमी केला आहे. मोठे प्रकल्प या वर्षात सुरू केले जाणार नाहीत. यामुळे नगरसेवकांना प्रभाग समिती व नगरसेवक निधीचा आधार होता. निवडणुकीमध्ये सर्वच उमेदवारांनी नागरिकांना प्रचंड आश्वासने दिली होती. परंतु प्रभाग समित्यांची रचनाच नसल्यामुळे एकही काम करता आलेले नाही. आयुक्तांच्या अधिकारामध्ये काही ठिकाणी कामे झाली आहेत. परंतु सर्वच प्रभागांमध्ये कामे झालेली नाहीत. प्रत्येक नगरसेवकाला १० लाख व प्रभाग समितीसाठी ४० लाख रुपयांचा निधी असतो. सहा महिन्यांमध्ये यामधील एकही रुपया खर्च केलेला नाही. प्रभागामधील गटारावरील झाकणे बसविणे, पदपथांची किरकोळ दुरुस्ती व इतर अत्यावश्यक कामे या निधीमधून करता येतात. परंतु सर्वच कामे ठप्प झाल्यामुळे नगरसेवकही हतबल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ स्थगिती उठवावी व लवकरात लवकर प्रभाग समित्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक करू लागले आहेत. महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, प्रभाग समित्यांच्या रचनेस नगरविकास खात्याने स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठली की लगेच समित्यांच्या रचनेचे काम केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.