शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना प्रतीक्षा मोबदल्याची

By admin | Updated: December 10, 2015 02:00 IST

महाड औद्योगिक वसाहतीच्या रसायनयुक्त घातक सांडपाण्यामुळे सावित्री खाडीलगत असणारी शेकडो हेक्टर शेतजमीन नापीक झाली आहे

दासगाव : महाड औद्योगिक वसाहतीच्या रसायनयुक्त घातक सांडपाण्यामुळे सावित्री खाडीलगत असणारी शेकडो हेक्टर शेतजमीन नापीक झाली आहे. वारंवार या पाण्यामुळे इतरही शेतीला दरवर्षी नुकसान होत आहे. मात्र नुकसानीचे पंचनामे फक्त तुडील विभागातच शासनाकडून करण्यात आले असून दासगाव विभागातील खाडीलगत असणाऱ्या शेतकऱ्यांचा अद्याप नुकसानभरपाईमध्ये विचार न केल्याने या विभागातील शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दासगाव विभागातील शेतकऱ्यांवर झालेल्या या अन्यायाविरोधात रायगड जिल्हा शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवणार असल्याची माहिती अध्यक्ष तुकाराम शंकर देशमुख यांनी दिली आहे. २२ वर्षांपूर्वी महाड औद्योगिक वसाहतीची निर्मिती झाली. येथील कारखान्यातून घातक सांडपाणी थेट सावित्री खाडीत सोडण्यात येत होते. या घातक सांडपाण्यामुळे सावित्री खाडीलगत असणारी तुडील आणि दासगाव मधील शेतजमीन नापीक झाली. शेती नापीक होत असल्याने अनेक शेतकऱ्यांची शेती ओसाड पडली आहे. २०१० व त्यानंतर खाडीपट्टीतील तुडील विभागातील सात गावातील शेतकऱ्यांचे उधाणाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. एक कोटीचे नुकसान झाले असल्याचे पंचनामे महाड महसूल विभाग, कृषी विभाग, पंचायत समिती यांनी संयुक्त केले होते. त्यावेळी महाड औद्योगिक वसाहतीकडे नुकसानीची मागणीही केली होती, मात्र दासगावच्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत.खाडीलगतच्या दोन्ही बाजूतील शेती रासायनिक पाण्यामुळे दूषित झाली आहे. वारंवार या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. २०१० मध्ये व त्यानंतर शासनाकडून फक्त तुडील विभागातील नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. यावेळी दासगाव ते दाभोळ याही विभागातील खाडीलगत असणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या केमिकल्सच्या पाण्यामुळे दासगाव विभागातील ३०० हेक्टर शेतजमीन प्रभावित झाली आहे. - टी.एस.देशमुख, रायगड, जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष.