पनवेलकरांना घडणार लालबागच्या राजाचे दर्शन

By Admin | Updated: October 1, 2015 01:55 IST2015-10-01T01:55:23+5:302015-10-01T01:55:23+5:30

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भक्तगण लालबागमध्ये दाखल होत असतात. गणेशोत्सवाच्या काळात ही संख्या लाखोंमध्ये असते.

The vision of the King of Lalbaug will be done for Panvelkar | पनवेलकरांना घडणार लालबागच्या राजाचे दर्शन

पनवेलकरांना घडणार लालबागच्या राजाचे दर्शन

पनवेल : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भक्तगण लालबागमध्ये दाखल होत असतात. गणेशोत्सवाच्या काळात ही संख्या लाखोंमध्ये असते. मात्र ज्या भक्तांना लालबागच्या राजाचे दर्शन घडलेले नाही अशा भक्तांना पनवेलमध्ये राजाच्या दर्शनाची संधी प्राप्त होणार आहे. पनवेलमधील महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटना श्रीगौरा गणेशोत्सवानिमित्त लालबागच्या राजाची प्रतिकृती पनवेलमध्ये १ आॅक्टोबरला विराजमान केली जाणार आहे. उत्सवाचे हे २३ वे वर्ष असून याठिकाणी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात हा उत्सव साजरा केला जातो.
पनवेलमधील महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटना व फळभाजी विक्र ेते सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या २२ वर्षांपासून गौरा गणेशोत्सव साजरा केला जातो. या दोन्ही संघटनांचे अडीच हजारपेक्षा जास्त सभासद आहेत. लहान - मोठे उद्योगधंदे करून आपली उपजीविका भागविणाऱ्या व्यावसायिकांचा यामध्ये सहभाग आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात बाजारपेठा बहरलेल्या असतात. याठिकाणचे विक्रे ते देखील उत्सवकाळात व्यस्त असल्याने त्यांना सार्वजनिक गणेश मंडळामध्ये सहभागी होवून दर्शनाची संधी मिळत नाही. यामुळेच सर्व सभासदांनी एकत्र येवून गौरा गणेशाच्या स्थापनेची सुरु वात केली.
या उत्सवादरम्यान पारंपरिक बाल्या नृत्याचे कार्यक्र म याठिकाणी सादर केले जाते. नवी मुंबई, मुंबई, ठाणे, रायगड आदी भागातील लाखोंच्या संख्येने भक्तगण याठिकाणी येत असतात. (प्रतिनिधी)

Web Title: The vision of the King of Lalbaug will be done for Panvelkar