शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरार मनपा परिवहन लंगडीच

By admin | Updated: November 2, 2015 01:44 IST

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेला ३ वर्ष पूर्ण झालीत. परंतु अद्याप तिच्याकडे स्वत:ची आगारे नाहीत. त्यामुळे या सर्व बसेस रस्त्यावरच उभ्या करण्यात येतात

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेला ३ वर्ष पूर्ण झालीत. परंतु अद्याप तिच्याकडे स्वत:ची आगारे नाहीत. त्यामुळे या सर्व बसेस रस्त्यावरच उभ्या करण्यात येतात. त्यामुळे वसई, नालासोपारा व विरार या तीन्ही रेल्वेस्थानक परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. तसेच या बसेस महीनोनमहिने धुतल्या जात नाहीत. अतिशय गलिच्छ अवस्थेत असलेल्या बसेस द्वारे लोकांना ही सेवा देण्यात येते.महानगरपालिकेने ३ वर्षापूर्वी सुरू केलेल्या परिवहन सेवेला अल्पावधीतच चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु ती सुरू करण्यापूर्वी योग्य नियोजन न करण्यात आल्यामुळे आगार, कर्मचाऱ्यांसाठी विश्रांतीगृहे, बसेस वॉशिंग सिस्टीम व वाहनदुरूस्ती इ. महत्वाच्या यंत्रणा उभ्या राहू शकल्या नाहीत. परिणामी गाड्या धुणे व वाहने पार्क करणे इ. कामे रस्त्यावरच केली जातात. अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांना बसण्यासाठीही जागा नाही. त्यामुळे रस्त्यावर गलिच्छ अवस्थेतील बसेस धावताना पहावयास मिळत आहेत. या सेवेच्या माध्यमातून महानगरपालिका व ठेकेदारांना चांगला महसूल मिळत असतानाही प्रवाशांना सोयीसुविधा देण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. नव्याने नियुक्त झालेले आयुक्त सतिश लोखंडे यांनी याप्रकरणी लक्ष घालून परिवहन सेवा कशी सुधारेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वसई रोड रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेस नवघर परिसरात भर रस्त्यावरच बसेस उभ्या केल्या जात असल्यामुळे संध्याकाळी येथे प्रचंड वाहतुक कोंडी होत असून गोंधळाचे वातावरण निर्माण होत असते. मध्यंतरी महानगरपालिकेने एस.टी महामंडळाला आपल्या बसेस वळवण्यासाठी त्यांच्या आगाराचा वापर करण्यासंदर्भात चर्चा केली होती. परंतु महामंडळाने त्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे परिवहन सेवेची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. मुख्यालय वगळता महानगरपालिका हद्दीत कुठेही ही परिवहन यंत्रणा सक्षम यंत्रणा उभी करू शकली नाही. (प्रतिनिधी)