शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

उद्यानासाठी निर्माल्याच्या कंपोस्ट खताचा वापर

By admin | Updated: September 29, 2015 00:49 IST

कळंबोली, कामोठे वसाहतीत गणेश विसर्जनानिमित्त निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर सिडकोने कामोठे वसाहतीत कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प हाती घेतला आहे.

अरुणकुमार मेहत्रे, कळंबोलीकळंबोली, कामोठे वसाहतीत गणेश विसर्जनानिमित्त निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर सिडकोने कामोठे वसाहतीत कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प हाती घेतला आहे. यातून तयार झालेल्या खताचा वापर उद्यान त्याचबरोबर झाडांकरिता करण्यात येणार असल्याची माहिती सिडकोने दिली.कळंबोली व कामोठे वसाहतीत दरवर्षी साडेसात हजार घरगुती व सार्वजनिक गणपती बसविले जातात.त्यामध्ये कामोठे येथे ४१५७, व कळंबोलीत ३३८0 इतक्या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येते. सर्वाधिक पाच दिवसांचे ३६८0 इतके बाप्पा विराजमान होतात आणि त्यांचे विसर्जनही होते. इतक्या मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होत असल्याने त्याकरिता सिडकोला तयारी करावी लागते. कळंबोली येथील रोडपाली आणि कामोठे गाव व जुई गाव तलावात विसर्जन केले जाते. बाप्पांचे विसर्जन करीत असताना त्यांच्याबरोबर निर्माल्यही जलाशयात विसर्जित करण्यात येतअसे. त्यामुळे पाणी दूषित होवून जलचरांवर त्याचा परिणाम होत असे या कारणाने निर्माल्य पाण्यात टाकू नये, असे आवाहन विविध पर्यावरण, त्याचबरोबर सामाजिक संस्थांकडून करण्यात येत आहे. पनवेल नगरपालिकेने कृत्रिम तलाव करून यावर चांगला तोडगा काढला असला तरी सिडकोमध्ये मात्र अशी व्यवस्था करण्यात आलेली नाही. मात्र तरी सुध्दा प्रशासनाने यंदा निर्माल्याकरिता खास व्यवस्था केल्याचे आढळून आले. या कामी प्रशासन अधिकारी किरण फणसे यांनी पुढाकार घेत निर्माल्य संकलनाकरिता वेगळी सोय केली. अर्थात या कामी मिटकॉनकडूनही सकारात्मक पाऊल उचलण्यात आले. या संस्थेचे मुख्य व्यवस्थापक डॉ. आनंद सोनवणे यांनी सुध्दा या प्रकल्पाकरिता विशेष परिश्रम घेतले. याकरिता एकूण पाच निर्माल्य कलश व्हॅन, ११ लिटरच्या सहा आणि २१0 लिटरच्यादहाअशा एकूण १६ डस्टबिन विसर्जन तलावाच्या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या. अनिरुध्द अकादमीच्या स्वयंसेवकाचे सुध्दा या कामी सहकार्य घेण्यात आले होते. गेल्या दहा दिवसात दोन वसाहतीत एकूण पाच टन निर्माल्य संकलन झाले असल्याचे सिडकोकडून सांगण्यात आले. त्यामुळे तीन तलावात निर्माल्य टाकण्यास मनाई करण्यात आली होती. (वार्ताहर)