शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

उरणकरांना पावसाने झोडपले

By admin | Updated: June 29, 2017 02:59 IST

बुधवारी पहाटेपासूनच पडलेल्या मुसळधार पावसाने उरणकरांना चांगलेच झोडपून काढले आहे. तालुक्यातील पुनाडे, वशेणी, केळवणे, करंजा, केगाव,

लोकमत न्यूज नेटवर्कउरण : बुधवारी पहाटेपासूनच पडलेल्या मुसळधार पावसाने उरणकरांना चांगलेच झोडपून काढले आहे. तालुक्यातील पुनाडे, वशेणी, केळवणे, करंजा, केगाव, भेंडवळ आदी गावांतील अनेक रहिवाशांच्या घरात पावसाचे पाणी घुसल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तर चिरनेर गावातील नाले ओसंडून वाहू लागल्याने रस्तेही जलमय झालेत. यामुळे चिरनेर गावात पूर स्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी दमदार पावसामुळे आणि समुद्राच्या पाण्यामुळे खारबंदिस्ती फुटून सुमारे अडीच हजार एकर शेती क्षेत्रात समुद्राचे पाणी शिरून नापीक झाल्याच्या घटनाही निदर्शनास आल्या आहेत. पूरग्रस्त आणि नुकसानग्रस्तांची पाहणी महसूल विभागाकडून करण्यात येत असून, शासकीय यंत्रणा आर्थिक नुकसानीचे पंचनामे करण्यात गुंतली असल्याची माहिती उरण तहसीलदार कल्पना गोडे यांनी दिली.मंगळवारी मध्यरात्रीपासून उरण परिसरात मुसळधार पाऊस बरसण्यास सुरुवात झाली होती. मोठ्या प्रमाणात बरसणाऱ्या पावसाला समुद्राच्या भरतीची साथ मिळाली. यामुळे नदी, नाले, गटारे तुडुंब भरल्याने उरण परिसरात अनेक गावांत पावसाचे पाणी शिरले. तालुक्यातील पुनाडे, वशेणी, करंजा, केगाव, भेंडखळ आदी गावांतील अनेक रहिवाशांच्या घरात पावसाचे पाणी घुसले. घरात शिरलेल्या पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडालीच. त्याशिवाय घरातील जीवनाश्यक आणि मौलिक सामान पावसाच्या पाण्याने भिजून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानही झाल्याच्या अनेक रहिवाशांच्या तक्रारी आहेत.तर केळवणे, पुनाडे आणि वशेणी गावांतील खारबंदिस्ती बंधारे फुटून समुद्राचे पाणी शेतीत घुसल्याची तक्रार आ. प्रशांत ठाकूर यांनी केली आहे. समुद्राचे पाणी शिरून सुमारे अडीच हजार एकर शेत जमिनीत समुद्राचे पाणी शिरले असून, जमीन नापीक झाली आहे. यामुळे शेकडो शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले असल्याची माहिती तहसील कार्यालयातून दिली.