शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

खारघर-पनवेल प्रवासासाठी दोन तास

By admin | Updated: July 16, 2017 02:48 IST

खारघर ते पनवेल महामार्गावरून प्रवास करताना एरवी १५ मिनिटांचा कालावधी लागतो. मात्र, सध्या रस्त्यावरील खड्डे, साचलेले पाणी यामुळे हा प्रवास सुमारे दोन तासांवर गेला

- वैभव गायकर । लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : खारघर ते पनवेल महामार्गावरून प्रवास करताना एरवी १५ मिनिटांचा कालावधी लागतो. मात्र, सध्या रस्त्यावरील खड्डे, साचलेले पाणी यामुळे हा प्रवास सुमारे दोन तासांवर गेला आहे. देशातील व्यस्त महामार्गापैकी सायन-पनवेल महामार्ग ओळखला जातो. त्यामुळे या मार्गावर मोठी वर्दळ असते. पावसाळ्यात रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे चालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. सायन-पनवेल महामार्गावर टोलवेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून अवजड वाहनासाठी टोल वसूल करण्यात येतो. मात्र, त्या तुलनेने रस्त्याची देखरेख होत नाही. रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत. मोठमोठे खड्डे चुकवण्याच्या नादात वाहने एकमेकांवर धडकण्याचे प्रकार वाढले आहेत. हिरानंदानी ते कोपरा पुलावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. पिकअवर्समध्ये ही परिस्थिती आणखीनच गंभीर होते. टोल प्रशासनाकडून सार्वजनिक बांधकाम खात्याकडे बोट दाखवले जात आहे. मान्सूनपूर्व या ठिकाणी कंत्राटदाराने कोणत्याही प्रकारची कामे केली नाहीत. त्यामुळे कंत्राटदारांकडून कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र, प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने कंत्राटदारांना भय राहिले नसल्याची प्रतिक्रिया या मार्गावरून दररोज प्रवास करणारे अमित रणदिवे यांनी दिली. कामोठे येथे एका मार्गिकेचे काम रखडल्याने वाहनांना कामोठेत प्रवेश करण्यासाठी कळंबोली उड्डाणपुलाखालून वळसा घालून यावे लागते. त्यानंतर पुढे जाताना कळंबोली सर्कलजवळ चारही बाजूने येणाऱ्या वाहनांमुळे मोठी कोंडी होते. पावसाळ्यातील रस्त्यांची होणारी दुरवस्था पाहता, सार्वजनिक बांधकाम खाते व टोल प्रशासन दोघांशी पत्रव्यवहार केले होते. मात्र, तरीही दखल घेतली गेलेली नाही. या मार्गावर होणारी वाहतूककोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. - प्रवीण पांडे, सहायक पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा