शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

तस्करी करणारी टोळी जेरबंद

By admin | Updated: October 28, 2015 23:26 IST

येथील कोकवनजवळील गोठणवाडी येथे शिकारीला लावलेल्या जाळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यू झाला होता. या मृत बिबट्याच्या पायाचे पंजे छाटून तस्करी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या

रोहा : येथील कोकवनजवळील गोठणवाडी येथे शिकारीला लावलेल्या जाळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यू झाला होता. या मृत बिबट्याच्या पायाचे पंजे छाटून तस्करी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून या टोळीच्या मुख्य म्होरक्यासहित अन्य दोन जण अद्याप फरार आहेत. पोलिसांनी हत्यारासहित पंजा जप्त केला आहे. या प्रकरणातील दुसऱ्या पंजाची तस्करी मुरुड तालुक्यात झाली असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.कोकवन येथे मुरुड - सुपेगाव मार्गावर गोठणवाडी गावापासून चारशे मीटर अंतरावर जाऊचा मळा या ठिकाणी शिकार करण्यासाठी लावण्यात आलेल्या फासामध्ये साठ किलो वजनाचा बिबट्या अडकून मृत झाल्याची घटना १२ आॅक्टोबरला मध्यरात्रीच्या दरम्यान घडली होती. बिबट्याचा पायाचे पंजे शस्त्राने छाटून नेल्याने या बिबट्याच्या मरणाबाबत चर्चेला उधाण आले होते.या घटनेची दखल वनखाते व पोलिसांनी घेत तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली. मिळालेलया गुप्त माहितीनुसार वनखाते व रोहा पोलिसांनी याच भागात राहणारा हरी नागू वाडकर याच्या मुसक्या आवळताच त्यांनी सर्व माहिती पोलिसांना दिली. ज्या शेतात ही घटना घडली ती शेती कसणारा शेतकरी गंगाराम काशिनाथ पाटील यांना पोलिसांनी अटक करताच त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार घटनेदरम्यान पहारा करणारा नजीर महम्मद भुरे याला देखील रविवारी सायंकाळच्या दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.हरी वाडकर याने केलेल्या गुन्ह्याची कबुली देत बिबट्याचा पंजा छाटण्यासाठी वापरलेल्या शस्त्रासहित चोरलेला पंजा पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. या पंजे तस्करी प्रकरणातील मुख्य म्होरक्या हरी वाडकर याचा जवळचा नातेवाईक असून त्याने अन्य एका ग्रामस्थाच्या साथीने हा पंजा मुरुड तालुक्यातील एका श्रीमंत व्यक्तीला विकला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांच्या सापळ्यात तीन आरोपी सापडताच या मुख्य म्होरक्याने गावातून पलायन केले. (वार्ताहर)