शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

भात भिजल्याने व्यापारी नाखूष

By admin | Updated: December 10, 2015 01:48 IST

ऐन भात कापणीच्यावेळी भात भिजल्याने आता भरडून आणलेले तांदूळ घेण्यास व्यापारी नाखूष दिसत असून तांदळासह भाताचा पेंढाही भिजल्याने कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे

संजय कांबळे,  बिर्लागेटऐन भात कापणीच्यावेळी भात भिजल्याने आता भरडून आणलेले तांदूळ घेण्यास व्यापारी नाखूष दिसत असून तांदळासह भाताचा पेंढाही भिजल्याने कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. तर याचा परीणाम म्हणून यंदा तांदळाचे उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.कल्याण तालुक्यात ५ हजार ६९२ हेक्टर क्षेत्रावर भात पिक घेतले जाते. सह्याद्री, कर्जत, रत्ना, सुवर्णा, पनवेल, जया, आरपी आदी भाताच्या जातीची लागवड यंदा केली होती. आवटी, मांजर्ली, घोटसई, म्हसकळ, फळेगाव, उशीद, गेरसे, कोसले, वेहळे, पोई, दहागाव, बापसई, रायते, मानिवली, चोरे, रोहन आदी गावात मोठ्या प्रमाणात भात लागवड करण्यात आली. कल्याण पंचायत समितीच्या कृषी विभागाने बियाणे, खते यांचे वाटप केले. यामुळे यावर्षी पिक चांगले आले. मात्र ऐन कापणीच्यावेळी अतिवृष्टी झाल्यामुळे कापलेले भात शेतातच भिजले. ३ ते ४ दिवस ते पाण्यात राहिल्याने त्याला कोंब येवू लागले. यातूनही शेतकऱ्यांनी कसेबसे भाताचे पेंढे बाहेर काढले व तोडणी केली.मात्र अतिवृष्टीने भिजलेले भात भरडाई करताना त्यातून अखंड तांदूळ मिळत नाही. तसेच भिजलेल्या भातापासून निघालेला तांदूळ लालसर रंगाचा होत असल्याने त्याला बाजारात गिऱ्हाईक पसंत करीत नाही. शिवाय जास्त भिजलेले भात हातात धरताच त्याचे पिठ होते. या भिजलेल्या भाताला छापलेले भात असे म्हटले जाते. प्रामुख्याने देशात सर्वात जास्त तांदूळ पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश या राज्यात उत्पादीत होतो. आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून तांदळाची नवीन आवक सुरु होते. त्यापूर्वी कृषी विभागामार्फत अंदाज व्यक्त केला जातो. जून महिन्यापासून १५ सप्टेंबर पर्यंत देशात सरासरीच्या ८४ टक्के पाऊस पडला. त्यामुळे तांदळाच्या उत्पादनात घट होईल, असे कृषी विभागाला वाटते.