शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पेणमध्ये साथीचे तीन बळी

By admin | Updated: November 1, 2014 22:29 IST

स्वच्छ भारत अभियानास 2 ऑक्टोबरपासून देशपातळीवर धूमधडाक्यात सुरुवात झाली खरी, मात्र आजही खेडय़ातील भारत अस्वच्छतेच्या गर्तेत अडकला आहे.

पेण : स्वच्छ भारत अभियानास 2 ऑक्टोबरपासून देशपातळीवर धूमधडाक्यात सुरुवात झाली खरी, मात्र आजही खेडय़ातील भारत अस्वच्छतेच्या गर्तेत अडकला आहे.  अस्वच्छता दूर कोणी करायची, कच:यांचे ढीग कोणी उचलायचे, यासाठी ग्राम प्रशासन व जनतेत एकसंधता नसल्याने या अस्वच्छतेमुळे तापाच्या साथीत बळी जात आहेत. गेल्यावर्षी 16 बळी गेले. यावर्षी सुरुवातीलाच 3 जणांचा मृत्यू झाल्याने अस्वच्छता हीच सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्यास कारणीभूत ठरल्याचे चित्र पेणमध्ये आहे.
गावचा व शहरांचा घनकचरा दिवसेंदिवस वाढत आहे. आणि यातूनच साथीच्या रोगांची लागण होताना दिसत आहे. पेणच्या मळेघर गावात भीमाबाई म्हात्रे (56) व रेश्मा मोकल (32) तर उचेडे गावातील बाळाजी परशुराम म्हात्रे (56) या तीन रुग्णांचा तापसदृश्य साथीने मृत्यू झाला. 
मळेघर गावात सांडपाणी व कच:याचे ढीग जागोजागी आढळले. गावाच्या शेजारी असलेल्या परिसरातील अस्वच्छता, त्याचबरोबरीने काश्मिरे गावातही असेच कच:याचे ढीग पसरले आहेत. स्वच्छता कोणी करायची, हा प्रश्न ऐरणीवरचा आहे. ग्रामपंचायत, तेथील लोकप्रतिनिधी गावकरी यांच्या एकत्रित सहभागाचा प्रश्न असूनही जोतो जबाबदारी झटकताना दिसत आहे. आरोग्य यंत्रणा गावात गेले दोन दिवस तळ ठोकून आहे. वाशी आरोग्य केंद्राच्या डॉ. आरती माने, आरोग्य सुपरवायझर एन. एल. पाटील, के. जी. भोईर, डी. पी. म्हात्रे व अन्य अशा आठ कर्मचारीवर्गाने 174 घरांना भेटी देवून प्रतिबंधक औषधाचे वाटप केले आहे. 1क् रुग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी ठाणो येथे पाठविले. 13 रुग्णांवर उपचार झाले आहे.
 
सगळीकडे कचरा
या परिसरात फेरफटका मारला असता जागोजागची अस्वच्छता लक्ष वेधून घेत आहे. गावे स्वच्छ व्हावीत यासाठी गावानेच पुढाकार घ्यावा. ग्रामपंचायतीने यासाठी गावाला विश्वासात घेणो ही काळाची गरज व्हावी. आपले सामाजिक स्वास्थ्य अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणो आवश्यक आहे.