शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन हजार मुक्या जिवांना जीवनदान

By admin | Updated: September 27, 2015 00:20 IST

वाढत्या शहरीकरणामुळे इमारतींची संख्या वाढत आहेत आणि पशुपक्ष्यांच्या राहण्याची जागा नागरिकांनी घेतल्याने या पक्ष्यांना मात्र आसरा न मिळाल्याने शहराचा इमारतींवर आसरा घ्यावा लागतो

प्राची सोनवणे, नवी मुंबईवाढत्या शहरीकरणामुळे इमारतींची संख्या वाढत आहेत आणि पशुपक्ष्यांच्या राहण्याची जागा नागरिकांनी घेतल्याने या पक्ष्यांना मात्र आसरा न मिळाल्याने शहराचा इमारतींवर आसरा घ्यावा लागतो. वाशी परिसरातील भुमी जीवदया संवर्धन संस्थेच्या वतीने शहरातील मुक्या जीवांवर मोफत उपचार करुन त्यांना मायेचा आसरा दिला आहे. या वर्षभरात या संस्थेच्या वतीने साडेतीन हजार मुक्याजीवांचे प्राण वाचविण्यात आले आहे. नवी मुंबई परिसरातील कुठेही एखादा जखमी पक्षी, प्राणी आढळल्यास या संस्थेचे स्वयंसेवक स्वत: जाऊन त्या मुक्या जीवावर मोफत उपचार करतात, त्याला पुर्णत: बरे होईपर्यंत त्याच्यावर देखरेख ठेवण्यात येते. नवी मुंबई शहरात दिवसेंदिवस पक्ष्यांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येते असे असताना वाढते प्रदुषण, मानवी वस्तींसाठी होणारी झाडांची कत्तल अशा अनेक कारणांमुळे मुक्या प्राण्याचा बळी जात असल्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. या सर्व घटनांचे गांभीर्य ठेवून वाशी परिसरात राहणारा सागर सावला या तरुणाने मुक्या जीवांच्या रक्षणासाठी भुमी जीवदया ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. राघवजी वाघजी पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली २७ जुलै २०१४ रोजी भुमी जीवदया संवर्धन संस्थेची स्थापना करण्यात आली. या वर्षभराच्या कालावधीत सरपटणारे प्राणी, गाय, बैल, म्हैस तसेच विविध प्रकारच्या पक्ष्यांवर उपचार करुन त्यांचे प्राण वाचविण्यात आले आहे. वाशीतील लहानश्या खोलीत सुरु केलेल्या या संस्थेचा पुढे विस्तार करावयाचा असून यासाठी या संस्थेला मदतीची अपेक्षा आहे अशी माहिती सागर सावला यांनी दिली. या संस्थेत कार्यरत असलेले धवल देढीया, सचिन धरोड तसेच हित देढीया ही रात्रंदिवस शहरातील मुक्या जीवांच्या उपचाराकरिता मेहनत घेत असतात.