शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पोयनाड दरोड्यातील तीन आरोपींना अटक

By admin | Updated: September 26, 2015 23:16 IST

पोयनाड येथील सुरभी ज्वेलर्सवर टाकलेल्या दरोड्यातील तीन आरोपींना रायगड पोलिसांनी भिवंडी येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून अर्धा किलो सोनेही हस्तगत करण्यात आले आहे.

अलिबाग : पोयनाड येथील सुरभी ज्वेलर्सवर टाकलेल्या दरोड्यातील तीन आरोपींना रायगड पोलिसांनी भिवंडी येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून अर्धा किलो सोनेही हस्तगत करण्यात आले आहे. अन्य चार आरोपींना लवकरच जेरबंद करण्यात येईल, असा विश्वास रायगड पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबतची पत्रकार परिषद रविवारी दुपारी जिल्हा पोलिस अधिक्षक सुवेझ हक घेणार आहेत.२६ आॅगस्ट २०१५ रोजी अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथील बाजारपेठेतील सुरभी ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यात आला होता. यावेळी टोळील एकाला दुकानाचे मालक भारत जैन यांनी पकडले होते. दरोड्यामध्ये सुमारे साडे तीन किलो सोन्याचे दागिने आणि सुमारे दहा लाख रुपयांची रोकड असे एकूण एक करोड चार लाख लुटण्यात आले होते. या गुन्ह्यातील अन्य दोन आरोपींना आधीच अटक केली आहे. त्यापैकी एक पोयनाड येथीलच असून दुसरा आरोपी भिवंडीचा आहे. पोलिसांना तपासात त्यांच्याकडून कोणतीही सखोल माहिती मिळत नव्हती. हा तपास रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सायबर सेलच्या मदतीने तीन आरोपींचा छडा लावण्यात यश मिळवले. पकडण्यात आलेल्या तीनही आरोपींना भिवंडीतून अटक केल्याचेही सुत्रांनी स्पष्ट केले. याप्रकरणातील आणखी चार आरोपींचा शोध पोलीस घेत असून लवकरच त्यांच्या मुसक्या आवळण्यात येतील, अशी माहिती पोलिस सुत्रांनी दिली. (वार्ताहर)