शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीस अटक

By admin | Updated: October 31, 2015 00:17 IST

घरफोडी व सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात सक्रिय असलेल्या दोन टोळ्यांना कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण १० लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

नवी मुंबई : घरफोडी व सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात सक्रिय असलेल्या दोन टोळ्यांना कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण १० लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. परिसरातली वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांनी मोर्चेबांधणी केली होती. यानुसार खबऱ्यांद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी करून काही ठिकाणी धाडसत्रही सुरू केले होते. त्यामध्ये घरफोडी व सोनसाखळी चोरी करणाऱ्या सहा जणांना अटक केली आहे. त्यापैकी दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. दोघेही सोनार असून, चोरीचे दागिने ते खरेदी करायचे. तुफान राजपुरोहित (यश ज्वेलर्स) व संजय पिचड (राकेश ज्वेलर्स) अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी सुमारे ३९ तोळे सोन्याचे चोरीचे दागिने गाळून त्यापासून लगडी बनवल्या होत्या. परिसरात घरफोडी करणारे रोहित दौंडकर (२१) व अजय मोरे (२३) हे चोरीचे दागिने त्यांना विकायचे. यानुसार त्यांनाही अटक करण्यात आली आहे. रोहित घणसोली गावचा राहणारा असून, अजय हा कोपरखैरणे गावचा राहणार आहे. निरीक्षक विजय तायडे, साहाय्यक निरीक्षक विक्रम बनसोडे, उपनिरीक्षक योगेश देशमुख, हवलदार संजय पाटील, विनोद पाटील, अजय नंदुरकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या पथकाने कोपरखैरणे सेक्टर १९ येथील खाडीलगत परिसरातून दोघांना अटक केली. चौकशीत त्यांनी सहा घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. यानुसार त्यांच्याकडून पाच लाख ७५ हजार रुपये किमतीचे चोरीचे २३ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. शिवा परिसरात गस्तीदरम्यान दोघा सोनसाखळी चोरांना अटक करण्यातदेखील त्यांना यश आले आहे. श्याम बच्छेर (२३) व शवाज खान (२०) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. श्याम हा कोपरखैरणे गावचा राहणारा असून, एका इव्हेंट कंपनीत कामाला आहे. तर खान हा घणसोली सेक्टर ३ चा राहणार असून, सॉफ्टवेअर इंजिनीअरिंगचा विद्यार्थी आहे. त्यांनी सहा गुन्ह्यांची कबुली दिली असून, त्यांच्याकडून चोरीचे चार लाख रुपये किमतीचे १६ तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. खान याने नुकतीच एक जुनी मोटारसायकल खरेदी केली होती. यावरून तो बच्छेरच्या मदतीने परिसरात सोनसाखळी चोरी करीत होता. सहज करता येणारा गुन्हा असल्याने तो सोनसाखळी चोरी करू लागला होता. तर चोरीचे दागिने सोनारांना विकून आलेल्या पैशातून दोघेही अय्याशी करायचे. (प्रतिनिधी)