शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

खारघरमधील हॅप्पी स्ट्रीटमध्ये थिरकले आबालवृद्ध

By admin | Updated: March 16, 2017 03:15 IST

खारघर जिमखाना स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या माध्यमातून रविवारी सेंट्रल पार्कयेथे आयोजित केलेल्या हॅप्पी स्ट्रीट या कार्यक्रमाला खारघरवासीयांचा उदंड

पनवेल : खारघर जिमखाना स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या माध्यमातून रविवारी सेंट्रल पार्कयेथे आयोजित केलेल्या हॅप्पी स्ट्रीट या कार्यक्रमाला खारघरवासीयांचा उदंड प्रतिसाद लाभला. आबालवृद्धांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील उपस्थित होते. नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी अशाप्रकारच्या कार्यक्रमाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक ‘लोकमत’ होते. सकाळी ७ वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात उपस्थितांसाठी झुंबा, योगा, लगोरी, फुटबॉल, बॅडमिंटन, बच्चे कंपनीसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी खारघरमधील शेकडो नागरिकांनी कार्यक्रमात सहभागी होऊन विविध खेळांचा आनंद लुटला. खारघर जिमखाना स्पोर्ट्सचे अध्यक्ष गुरुनाथ गायकर व खारघर पटेल समाजाचे अध्यक्ष विनोद पटेल यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. इंटरनेटच्या युगात मैदानी खेळांचा सर्वानाच विसर पडला आहे. आपले स्वास्थ चांगले आरोग्यदायी ठेवण्यासाठी सर्वांनीच आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. शहरी भागातील धकाधकीच्या जीवनात अशाप्रकारच्या कार्यक्र माद्वारे नागरिकांचे आरोग्य जपण्याचा आमचा छोटासा प्रयत्न असल्याचे या अभिनव उपक्रमाबद्दल आयोजक गुरुनाथ गायकर यांनी सांगितले. लहान मुलांच्या अंगी असलेल्या गुणांना वाव देण्याच्या दृष्टीने आरोग्याच्या विविध प्रकारच्या मैदानी, तसेच सध्या लगोरी सारखे खेळ शहरी भागात नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या उपक्रमाद्वारे मैदानी खेळाची नवी ओळखही नव्या पिढीला होत असते. झुंबा या पाश्चिमात्य देशात संगीताच्या तालावर केल्या जाणाऱ्या नृत्यप्रकारामुळे आरोग्य तंदुरुस्त राहते. हसत, खेळत संगीताच्या तालावर केला जाणारा हा व्यायामाचा प्रकार शहरी भागात लोकप्रिय होत आहे. झुंबा या व्यायामाच्या प्राकारावरही या वेळी जमलेले शेकडो नागरिक थिरकले. कार्यक्रमाला उपस्थितांमध्ये खारघर सिडकोचे प्रशासक सीताराम रोकडे, आंतरराष्ट्रीय सायकलपटू राजेंद्र सोनी, सुदर्शन नाईक, सचिन पाटील, माजी उपसरपंच संतोष गायकर, हुसेन साबुवाला, प्रेमनाथ गायकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)