शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

करवसुली १०० कोटी; सुविधांची बोंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2015 01:12 IST

घणसोली विभागातून महापालिकेने अवघ्या तीन वर्षांत १०० कोटींची करवसुली केली आहे. मात्र या तुलनेत तिथे नागरी सुविधा पुरवण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचे दिसत आहे

सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबईघणसोली विभागातून महापालिकेने अवघ्या तीन वर्षांत १०० कोटींची करवसुली केली आहे. मात्र या तुलनेत तिथे नागरी सुविधा पुरवण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचे दिसत आहे, तर नोड अद्याप सिडकोकडून महापालिकेला हस्तांतर झाला नसल्याने नागरिकांना दोनही प्रशासनाचा कर भरावा लागत आहे.घणसोली नोडमधील रहिवाशांची संख्या ८० हजारांवर पोचली आहे. दहा वर्षांत परिसराचा झपाट्याने झालेला विकास पाहता पुढील काही वर्षांत तिथल्या लोकसंख्येत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र सायबर सिटीतल्या या आधुनिक शहरातील रहिवाशांना अद्यापही नागरी सुविधांची प्रतीक्षा करावी लागत आहे. घणसोली नोड अद्यापही सिडकोच्या ताब्यात असून तो महापालिकेकडे वर्ग करण्याची प्रक्रिया अनेक वर्षांपासून सुरू आहे. परंतु काही मुद्द्यांवर दोनही प्रशासन अडून बसल्याने त्याचा निकाल लागलेला नाही. असे असतानाही दोनही प्रशासन मात्र रहिवाशांकडून करवसुली करून तिजोरी भरत आहेत. विभागावर ताबा असल्याने तिथल्या बांधकामाचे विकास शुल्क सिडको वसूल करते. तर नियोजन प्राधिकरण महापालिकेचे असल्याने विभागात पुरवल्या जाणाऱ्या सुविधांचा कर महापालिका आकारत आहे. त्यामध्ये रस्ते, पथदिवे, गटार, मलनिस्सारण वाहिन्या, साफसफाई आदींचा समावेश आहे. या सुविधांच्या नावाखाली महापालिकेने घणसोली कॉलनी परिसरातून मागील तीन वर्षांत तब्बल ९८ कोटी १९ लाख रुपयांचा कर रहिवाशांकडून जमा केलेला आहे. मात्र मोठ्या प्रमाणात कराची वसुली करत असतानाही तिथल्या रहिवाशांना नागरी सुविधा पुरवण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरलेले आहे.कष्टकरी, माथाडी कामगारांचे वास्तव्य असलेल्या घरोंदा व सिम्प्लेक्स वसाहतीला लागून असलेल्या नाल्याची सफाई झालेली नाही. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसर विकसित करताना बनवलेल्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या प्रयत्नात मागील १५ वर्षांत ठिकठिकाणी ठिगळे लावली आहेत. पथदिवे रात्री बंद असल्याने वाहन चालकांना रस्त्यावरील या ठिगळांमधून मार्ग काढावा लागत आहे. तर पदपथांवर विद्युत विभागाच्या वायर पसरलेल्या असल्याने पादचाऱ्यांना जीव धोक्यात घेऊन चालावे लागते. यामुळे पादचाऱ्यांसोबत अपघाताच्याही घटना घडत आहेत. खेळाची मैदाने व उद्यानांसाठी भूखंड आरक्षित असले तरी वेळीच विकास न झाल्याने रहिवाशांना त्याचा लाभ होत नाही. सिडकोच्या दुर्लक्षामुळे काही भूखंडावर अनधिकृत झोपड्या तर काही ठिकाणी डेब्रिजचे ढीग पहायला मिळत आहे. सांडपाणी वाहून जाण्यासाठी रस्त्यालगत गटारे बनवली असून त्यावरील झाकणे गायब झालेली आहेत. पालिका नक्की कोणत्या सुविधेचा कर वसूल करते असा प्रश्न रहिवाशांना पडलेला आहे.