शहरं
Join us  
Trending Stories
1
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
2
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
3
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
4
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
5
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
6
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
7
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
8
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
9
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
10
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
11
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
12
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
13
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
14
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
17
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
20
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
Daily Top 2Weekly Top 5

तारापुर अणुकेंद्रातील कंत्राटींना ‘बाधा’?

By admin | Updated: January 9, 2015 22:50 IST

तारापुर अणुऊर्जा केंद्रातील अणुभट्टी (रियॅक्टर) क्र. ४ च्या देखभाल, दुरूस्ती व तपासण्या (मेंटनन्स) चे काम मागील महिन्यापासुन सुरू

बोईसर : तारापुर अणुऊर्जा केंद्रातील अणुभट्टी (रियॅक्टर) क्र. ४ च्या देखभाल, दुरूस्ती व तपासण्या (मेंटनन्स) चे काम मागील महिन्यापासुन सुरू असून तेथील किरणोत्सर्ग बाधीत असलेल्या क्षेत्रात पर राज्यातील शेकडो अप्रशिक्षित कामगार काम करीत असून त्यांच्या अज्ञानामुळे त्यांना किरणोत्सर्गाची बाधा होण्याची शक्यतेबरोबरच त्यांच्या हलगर्जीपणामुळे किरणोत्सर्गाचा प्रसार होण्याची भीती हलगर्जीपणामुळे किरणोत्सर्गाचा प्रसार होण्याची भीती अणुकेंद्रातील इतर कामगार व्यक्त करीत आहेत. ही भीती व्यक्त करण्याकरीता अणुकेंद्रातील अ‍ॅडमीन बिल्डींग जवळ सकाळी काही कामगार जमले होते. मात्र या बाबतीत अणुकेंद्र प्रशासनाशी संपर्क साधला असता कामगार त्यांच्या जनरल मागण्यांकरीता जमल्याचे सांगून किरणोत्सर्गाचा प्रसार होवू नये या करीता एईआरबी च्या मापदंडका नुसार सर्वोतोपरी काळजी घेण्यात येत असून रिअ‍ॅक्टर बिल्डींग बाहेर किरणोत्सर्ग पसरल्याचा त्यांनी इन्कार केला आहे. अणुऊर्जा केंद्रातील ५४० मेगावॅट क्षमतेच्या अणुभट्टी क्र. ४ चे रूटींन नुसार अणुभट्टी बंद करून मेंटनन्सचे काम करण्याकरीता १९ डिसेंबर २०१४ पासून ४५ दिवसाचे बनायन शट डाऊन घेण्यात आले असून त्याकरीता पर राज्यातून सुमारे ३५० ते ४०० कंत्राटी कामगार आणण्यात आले आहेत. हे काम दिवसरात्र सुरू असून अणुभट्टीतील असुरक्षिततेसहीत सर्व उपकरणे, यंत्रे, सुरक्षित आहेत का? ती पूर्ण क्षमतेने व योग्य पद्धतीने कार्यान्वित आहेत का? याची पडताळणी तसेच गरज भासल्यास दुरूस्ती एईआरबी च्या मापदंडकानुसार करण्यात येते तर अणुभट्टी पूर्ववत सुरू करण्याकरीताही एईआरबीची परवानगी घ्यावी लागते. शट डाऊनच्या दरम्यान किरणोत्सर्गाच्या भागात काम करणारे परराज्यातील कंत्राटी कामगार हे किरणोत्सर्गाबाबत अनभिज्ञ व अज्ञानी असल्याने ते फारशी गांभीर्याने काळजी घेत नसल्याने त्यांच्या हेल्मेट, कपडे व बुटाद्वारे किरणोत्सर्ग बाहेर येत असल्याची भीती तेथील स्थानिक कंत्राटी कामगारही दबक्या आवाजात व्यक्त करतात. (वार्ताहर)

तारापुर अणुऊर्जा केंद्र तीन व चारचे केंद्र संचालक हेमंत कुमार यांच्याशी संपर्क साधला असता शटडाऊन मध्ये काम करणाऱ्या कामगारांना देशातील इतर अणुकेंद्रात शट डाऊन दरम्यान काम केल्याचा अनुभव असतो, काम सुरू करण्यापूर्वी त्यांना कॉलनीमध्ये एक दिवसाचे ट्रेनिंग दिले जाते. त्यामध्ये सुरक्षिततेचाही भाग असतो. त्यांची बीपी सह संपूर्ण मेडीकल चेकअप करण्यात येते. तसेच ट्रेनिंग नंतरच त्यांचा गेट पास बनविण्यात येतो आम्ही कामाबरोबरच सुरक्षिततेला प्राधान्य देतो. अणुकेंद्रातील काही भागात रेडीएशन असते त्यांची काहींना बाधीही होत असते परंतु त्याचे प्रमाण अत्यल्प असते आणि तशी काळजीही घेण्यात येते. रेडीएशन बाबत एईआरबी च्या मापदंडकानुसार वर्षाला वीस मिलिसीव्हर्टची लिमिट असते तो ही टप्पा कधी गाठला जात नसल्याचे कुमार यांनी सांगून नथींग हॅज हॅपन्ड आॅल अंडर कंट्रोल असल्याचे सांगितले.