शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

कारवाई टाळल्याने पोलिसाचे निलंबन

By admin | Updated: November 2, 2015 01:49 IST

गुटखा बाळगल्याप्रकरणी पकडलेल्या टपरीचालकावर कारवाई टाळत सहकाऱ्यांनाच झापणाऱ्या पोलिसाला निलंबित व्हावे लागले आहे

नवी मुंबई : गुटखा बाळगल्याप्रकरणी पकडलेल्या टपरीचालकावर कारवाई टाळत सहकाऱ्यांनाच झापणाऱ्या पोलिसाला निलंबित व्हावे लागले आहे. कामोठे पोलीस ठाण्यातला हा प्रकार असून परिमंडळ उपायुक्तांनी चौकशीअंती त्या पोलिसाला निलंबित केले आहे.संपत्ती येळकर असे निलंबित झालेल्या झालेल्या पोलिसाचे नाव असून, तो कामोठे पोलीस ठाण्यात पोलीस नाईक पदावर कार्यरत होता. कामोठे पोलीस ठाण्यापासून काही अंतरावरच असलेल्या पाणाच्या टपरीवर बंदी असतानाही गुटखा विक्री होत असल्याची माहिती बिट मार्शल पोलिसांना वायरलेसवर मिळाली होती. यानुसार दोघे जण त्या ठिकाणी गेले असता त्यांना १०० रुपयांचा गुटखा आढळून आला. यामुळे जप्त केलेल्या गुटख्यासह टपरीचालक श्यामसुंदर पांडे याला पकडून ते दोघे जण पोलीस ठाण्यात आले होते. मात्र यावेळी येळकर याने दोघा बिट मार्शलना झापत पांडेवर कारवाई न करता सोडून दिले होते. त्यामुळे झालेल्या प्रकाराची माहिती दोघा बिट मार्शल पोलिसांनी वरिष्ठांना दिली होती. यावरून येळकर याची चौकशी लागली असता त्यामध्ये तो दोषी आढळला. यामुळे त्याचे निलंबन केल्याचे परिमंडळ २ चे उपायुक्त विश्वास पांढरे यांनी सांगितले. पकडलेल्या गुटख्यावर कारवाईला टाळाटाळ तसेच शिस्तभंगाचा ठपका ठेवून त्याच्यावर कारवाई केली आहे.