शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

सहा लाख रहिवासी वाऱ्यावर

By admin | Updated: September 25, 2015 02:36 IST

सिडकोेने पनवेल तालुक्यातील खारघर ते तळोजापर्यंतचा परिसर विकसित केला. या ठिकाणी ६ लाख पेक्षा जास्त नागरिक राहण्यास आले आहेत.

वैभव गायकर, पनवेलसिडकोेने पनवेल तालुक्यातील खारघर ते तळोजापर्यंतचा परिसर विकसित केला. या ठिकाणी ६ लाख पेक्षा जास्त नागरिक राहण्यास आले आहेत. परंतु या नागरिकांना अत्यावश्यक सुविधा देण्यास प्रशासन अपयशी ठरले आहे. उद्यान, मैदान, मार्केट, बसडेपो, रिक्षा स्टँड, समाजमंदिर यासारख्या सुविधाही नसल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होवू लागली आहे. मुंबईवरील लोकसंख्येचा ताण कमी करण्यासाठी शासनाने ठाणे, पनवेल व उरण तालुक्यामधील ९५ गावांमधील जमीन संपादित केली. प्रकल्पग्रस्तांची १७ हजार हेक्टर जमीन ताब्यात घेवून त्यावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर वसविण्याची जबाबदारी सिडकोवर सोपविण्यात आली. सिडकोने पहिल्यांदा बेलापूर ते ऐरोलीपर्यंतचा परिसर विकसित केला. तेथे प्रत्येक सेक्टरमध्ये उद्यान, मैदान, मार्केट,समाजमंदिर, शाळा यासाठी भूखंड राखून ठेवले. परंतु पनवेल तालुक्याचा विकास करताना मात्र नियोजनामध्ये प्रचंड त्रुटी ठेवल्या आहेत. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी लोकमत कार्यालयास भेट दिली असताना या परिसरातील प्रश्नांवर लक्ष वेधले. खारघर, तळोजा, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल, करंजाडे व उलवे परिसराचा विकास करण्यात आला आहे. मूळ गावठाण व विकसित नोडची लोकसंख्या ६ लाखपेक्षा जास्त झाली आहे. सिडकोने नागरिकांना भरमसाट आश्वासने दिली होती. परंतु त्यांची पूर्तता करण्यात आली नाही. सिडकोने सेक्टरनिहाय चांगले मैदान व उद्यान विकसित केलेले नाही. एकही सुनियोजित मार्केट बांधलेले नाही. खारघर ते पनवेलपर्यंत फक्त एकच बस डेपो आहे. रेल्वे स्टेशन वगळता इतर ठिकाणी नियोजित रिक्षा व टॅक्सी स्टँडही नाही. सिडकोने नागरिकांच्या करमणुकीसाठी तालुक्यामध्ये एकही नाट्यगृह उभारलेले नाही. वाहनतळासाठी जागा ठेवलेली नाही. समाजमंदिरांचा अभाव आहे. धार्मिक स्थळांसाठी जागा नाही. या परिसरात ६ लाखपेक्षा जास्त नागरिक रहात आहेत.