शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
5
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
6
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
7
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
9
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
10
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
11
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
12
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
13
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
14
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
15
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
16
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
17
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
18
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
19
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
20
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव कराविरोधात सह्यांची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 00:06 IST

खारघर फोरम : दोन दिवसांत सहा हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल महानगरपालिकेने रहिवाशांना पालिकेमार्फत आकारल्या जाणाऱ्या मालमत्ता कराच्या नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. खारघर शहरातदेखील या नोटिसा देण्यात येत असून, ज्यादा मालमत्ता काराविरोधात शहरातील खारघर फोरमच्या वतीने ऑनलाइन सह्यांची मोहीम सुरू केली आहे. अवघ्या दोन दिवसांत या मोहिमेत सहा हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग घेतला आहे. 

पनवेल महानगरपालिकेच्या वतीने पालिकेच्या स्थापनेपासून म्हणजेच २०१६ पासून ते २०२० पर्यंत मालमत्ता कराच्या नोटिसा रहिवाशांना बजावण्यास सुरुवात केली आहे. पालिका आकारात असलेला मालमत्ता कर हा अवाजवी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कामोठे, कळंबोलीपाठोपाठ शेवटच्या टप्प्यात खारघरमधील रहिवाशांना नोटिसा देण्यात येत आहेत. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात जादा कर आकाराला जात असल्याने शहरी भागातून मोठ्या प्रमाणात या नव्या करप्रणालीला विरोध होत आहे. खारघर कॉलनी फोरमने यासंदर्भात सुरू केलेल्या ऑनलाइन सह्यांच्या मोहिमेअंतर्गत नागरिकांना या कराबद्दल माहिती देताना काही मुद्दे उपस्थित केले आहेत. 

यामध्ये खारघर नोड अद्यापही पालिकेकडे हस्तांतरित न झाल्याने पालिका कोणत्या आधारावर जादा कर आकारणी करीत आहे? यासह पनवेल महानगरपालिका ड वर्ग महानगरपालिका असूनही कराची रक्कम अधिक आहे. कर भरल्यावर पालिकेकडून कोणत्या सोयी-सुविधा पुरविल्या जातील याबाबत स्पष्टता नाही, सिडको सुविधा पुरवीत असलेल्या अनेक बाबींवर पालिकेने कर आकाराला आहे, याबाबत सह्यांच्या मोहिमेत मोठ्या प्रमाणात आक्षेप घेतला जात आहे. नगरसेविका लीना गरड यांनी याबाबत पुढाकार घेतला आहे. 

हरकतीच्या फॉर्मवर आक्षेप नागरिकांना वाढीव मालमत्ता करासंदर्भात आपली हरकत नोंदविण्याचा अधिकार आहे. याबाबत नागरिकांच्या मागणीनुसार आम्ही हरकत फॉर्म त्यांना उपलब्ध करून दिले आहेत. मात्र खारघर अ प्रभाग कार्यालयातील कर्मचारी मनमानीपणे नागरिकांकडून हे फॉर्म स्वीकारण्यास मज्जाव करीत असल्याचा आरोप नगरसेविका लीना गरड यांनी केला. 

नियमानुसार रहिवाशांना मालमत्ता कराच्या नोटिसा बजावल्या आहेत. नागरिकांच्या हरकतींवर रीतसर सुनावणी घेऊन त्यानंतर  मालमत्ता कर आकारणी केली जाईल. - संजय शिंदे (उपायुक्त, पनवेल महानगरपालिका)